[ad_1]

मुंबई: ‘ठरलं तर मग’च्या आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला अर्जुन सायलीला समजावतो की त्यांना जर भविष्यात वेगळं व्हायचं असेल तर तिने सगळ्या परिस्थितीत सर्वांशी चांगलं वागणं सोडून दिलं पाहिजे. तन्वी ओव्हरस्मार्ट आहे, तिच्याशी प्रेमाने वागलात तर ती आणखी त्रास देईल. सायलीला शंका असते की तिला असं वागता येईल की नाही. यानंतर सायलीने ज्या अवस्थेत त्याला आणि प्रियाला एकत्र पाहिलं असतं, त्यावरुन ती त्याला चिडवते. तेव्हा अर्जुन तिला स्पष्टीकरण देतो की प्रियाने त्याच्याशी मुद्दाम जवळीक केली. सायली म्हणते की तिची काहीही हरकत नाही.

दुसरीकडे प्रियाचं खोटं रडगाणं पूर्णा आजी आणि अस्मितासमोर सुरुच असतं. तेवढ्यात नागराज तिला फोन करुन महिपतकडे बोलावून घेतो. ती गेल्यानंतर अस्मिताही आगीत तेल ओतायचं विसरत नाही. पूर्णा आजीने सायलीला ओरडल्यामुळे प्रिया खुशीत गाजरं खात असते. त्यानंतर प्रिया सायलीला फोन करते. सायलीला फोन करुन ती विचारते की तू अजूनही कॉफीमधलं विष शोधतेयंस का? ती असं विचारते आणि तिने काय कारस्थान रचलं ते सांगते. ती तिला सांगते की तिने मुद्दाम तिला बघून कॉफीमध्ये व्हॅनिला सिरप टाकलं. प्रिया तिला अर्जुनापासून चार हात दूर राहायला सांगते.

विशाखाच्या आयुष्यात आलंय मोठं वादळ, देशमुखांच्या घरातील आणखी एक घटस्फोट अरुंधती थांबवू शकेल?
तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो की प्रियाला चांगलंच खडसाव. अर्जुनच्या सांगण्यावरुन सायली प्रियाला खूप सुनावते, काही फिल्मी डायलॉगही ऐकवते. अर्जुनच्या जवळ आलीस तर झिंज्या उपटून हातात देईन, अशी धमकीच ती सरळ तिला देते. तेव्हा बोलता बोलता प्रिया बोलून जाते की, ‘सायली तू कितीही दादागिरी केलीस तरी मी अर्जुनला माझ्या आयुष्यातून जाऊ देणार नाही. त्याची खरी गरज मला मधुभाऊंच्या केसमधून सुटण्यासाठी आहे. ते होईपर्यंत मी त्याला कशी जाऊ देईन.’ प्रियाचा फोन स्पीकरवर असल्याने अर्जुनही तिचं हे बोलणं ऐकतो. तिचं म्हणणं असतं की मधुभाऊंच्या केसच्या निमित्ताने सायलीने अर्जुनला जाळ्यात ओढलं. प्रिया तिला स्वार्थीही म्हणते.

नितीन देसाई यांनी आधीच सांगितलेलं ‘यंदा वाढदिवस साजरा करणार नाही’; अन् उजाडला तो काळा दिवस
तेव्हा रागाचा पारा चढल्यानंतर सायली म्हणते की, ‘मी पैशांसाठी नाती जोडत नाही, मी फक्त मधुभाऊंसाठी या घरात आहे.’ प्रियाला तिचा संशय येतो आणि ती असं का म्हणाली याविषयी प्रश्न विचारू लागते. तेव्हा सायली विषय सावरुन घेते आणि तिलाच विचारते की तिला नेमकं कशातून सुटायचं आहे? अर्जुन सायलीने घातलेल्या गोंधळामुळे वैतागतो, पण त्याच्या हेही लक्षात येतं की प्रिया आश्रम मर्डर केसमध्ये फक्त साक्षीदार नाही आहे. प्रिया महिपतकडे पोहोचते आणि तिच्यावर सर्व चांडाळ चौकडी प्रश्नांची सरबत्ती करते. किल्लेदार आणि अर्जुन यांच्याकडून केसविषयी काहीच खबर नाही काढल्याने सर्वजण तिच्यावर वैतागले असतात. ती सुचवते की केसआधी साक्षी आणि तिच्या अण्णांनी किल्लेदारला स्वत:हून भेटणं आवश्यक आहे.

दुसरीकडे पूर्णा आजी फतवा काढतात की सायलीने आज जेवायचं नाही. तिने तन्वीवर अर्जुनचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याने पूर्णा आजी तिला शिक्षा देतात. सायली निमूटपणे तिची शिक्षा भोगते. दुसऱ्या दिवशीच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की सायलीला पूर्णा आजीने उपाशी ठेवल्यामुळे अर्जुनही तिच्यासोबत उपाशी राहण्याचं ठरवतो.

‘ज्ञानेश्वर माऊली’ मालिकेत उभारलेल्या आळंदीचे दर्शन; मुक्ताबाई म्हणजेच सायली गावंडसोबत सेटची सफर

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *