[ad_1]

अनंत साळी, जालना :अंबड तालुक्यातील अंतरावाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी सरकारला एका महिन्याचा वेळ दिला आहे. सरकारनं एका महिन्यात निर्णय घेतला नाही तर ३१ व्या दिवशी उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. हे आंदोलन सामान्य मराठ्यांनी उभं केलं आहे. आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळं कुणीही उग्र आंदोलन करु नका, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.

मराठा समाजाच्या युवकांनी शांततेनं आंदोलनं करावं, उग्र आंदोलन करु नये, असं मनोज जरांगे म्हणाले. आपल्यावर जळणाऱ्या शत्रूंना यशस्वी होऊ द्यायचं नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. समाजानं एक महिना वेळ दिला आहे, असं जरांगे म्हणाले.

Weather Forecast: गणेशोत्सवाच्या तोंडावर पावसाबाबत मोठी बातमी, मुंबईसाठी पुढील ३ दिवस महत्त्वाचे, वेदर अपडेट

जरांगेंच्या सरकारला पाच अटी

अहवाल कसा आला तरी महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र द्यावी लागणार, महाराष्ट्रात जेवढे गुन्हे दाखल झाले ते मागे घ्यायचे, जेवढे अधिकारी दोषी आहेत त्यांना निलंबित करण्यात यावं, उपोषण सोडायला, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सगळं मंत्रिमंडळ उपस्थित असलं पाहिजे. उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती देखील आले पाहिजेत. उदयनराजे भोसले यांना मध्यस्थी ठेवणार आहेत. दोघांच्या मध्ये सरकार आणि मराठा समाज्या मध्ये दोन्ही राजे असावेत, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. उदयनराजे आपल्या बाजूनं आहेत. सरकार यांच्यावतीनं आम्हाला हे सगळं लिहून टाइम बाऊंड घेऊन लिहून द्या, आणि तुम्हाला दिलेल्या एक महिना हे मान्य असल्यास सरकार कधी उपोषण सोडायला बोलवायचं हे सांगा, असं मनोज जरांगे म्हणाले.

Manoj Jarange : केसेस मागं घेतल्या, निलंबनाचा निर्णय झाला पण आरक्षणाचं काय? मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल

मी शब्द दिला आहे तुम्ही कुणाचा निषेध करायचा नाही. काय करायचं ते ३१ व्या दिवशी करा, असं मनोज जरांगे म्हणाले. सरसकट गुन्हे मागं घेतल्याचं पत्र आलेलं आहे. चार दोषींना त्यांनी निलंबित केलं आहे, जे राहिलेत त्या सगळ्यांना कायमचे निलंबित करा, असं मनोज जरांगे म्हणाले. आरक्षण घेण्यासाठी अभ्यासपूर्वक बोलल्याशिवाय पर्याय नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी रोहित शर्माने संघात केला मोठा बदल, जाणून घ्या कसा आहे भारताचा संघ

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *