[ad_1]

कोपरगाव: महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गटाने आणि भाजपाने एकत्र येत सत्ता स्थापन केल्यानंतर आता राष्ट्रवादीचा अजित पवार गटही सत्तेत सामील झाल्याने अनेक विधानसभा मतदारसंघातील चित्र बदललय. एकमेकांच्या विरोधात विधानसभा लढलेले उमेदवार आता एकत्र आलेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हालाच तिकीट मिळणार, असा दावा दोन्ही उमेदवारांकडून केला जातोय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महा युतीचा जागा वाटपाचा काय फॉर्म्युला ठरतो? त्यानंतर कोण बंड करणार यामुळे निवडणुकीत रंगत वाढणार आहे.

२०१९ची विधानसभा निवडणूक भाजप सेनेने एकत्र लढवली, त्याच्या विरोधात काही ठिकाणी काँग्रेसचे तर काही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार उभे होते. मात्र आता राज्यातील सत्ता बदलाने एकमेकांचे राजकीय विरोधक सख्खे शेजारी झाले आहेत. यातच कोपरगावच्या पारंपारीक राजकीय विरोधक असलेले काळे-कोल्हे घराण्याचाही समावेश आहे.

कोपरगावचे सध्याचे आमदार हे राष्ट्रवादीचे आशुतोष काळे आहेत. त्यांनी भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा अवघ्या आठशे मतांनी पराभव करत बाजी मारली होती. गेली चार वर्षे आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवत या दोन्ही नेत्यांनी मतदार संघात बांधणी केली होती. आता मात्र राष्ट्रवादी आणि भाजप दोघेही सत्तेत सहभागी झालेत. सत्ता बदलाच्या काळात अजित पवारांनी कोपरगावची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच राहणार आणि उमेदवारी ही मलाच दिली जाणार, असा शब्द दिल्याचे आमदार काळे यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या समोरच सांगितले. कोपरगाव पंचायत समिती कार्यालयात शासन आपल्या दारी उपक्रमाच्या तयारीची आढावा बैठक होती. या बैठकीत बोलताना आमदार अशुतोष काळे यांनी विधानसभेच्या तिकिटासंदर्भात माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या समोरच भाष्य केले. यावेळी उपस्थित होते अशा पिकला.

आमदार आशुतोष काळे यांनी जाहीररित्या तिकीट मला असे सांगितल्यानंतर भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी त्यावर उत्तर दिले. राज्यात सत्ता बदल झाले. आमच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आली आहे. मलाही आमच्या पक्ष श्रेष्ठींनी आता एबी फॉर्म देऊ का असे विचारले आहे. अजून पुला खालून बरेच पाणी वाहून जायचे आहे. सध्या शासन आपल्या दारीची चर्चा आहे, आशुतोष काळे उत्साहात बोलल्याचे कोल्हे म्हणाल्या.

राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आपण युती म्हणून मतदारांकडे मते मागितली. मात्र उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसल्याचे भाजपाचे नेते वारंवार सांगतात. मात्र ज्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात भाजपाच्या उमेदवारांनी निवडणूक लढवली, काही जिंकले काही हारले त्यांनी आता आगामी विधानसभा निवडणुकीची कशी तयारी करायची, मतदारांना काय सांगत सामोरे जायच, हा ही प्रश्न उमेदवारांसमोर असणार असून नेमके तिकीट कोणाला मिळणार? तिकीट वाटपा वेळी पुन्हा बंडाळी होईल का? हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *