[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे शहराला वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी अखेर चांदणी चौकातील उड्डाणपूलासह रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. येत्या शनिवारी (१२ ऑगस्ट) केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या चौकातील मार्गाचे लोकार्पण होणार आहे. त्यावेळी राज्याचे मुख्यमत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहे. उदघाटनानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांनी सांगितले.

चांदणी चौकात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा निघावा यासाठी स्थानिक नागरिकांसह लोकप्रतिनिधीकडून मागणी होत होती. माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी त्याबाबत पुढाकार घेत या चौकातील कामाचे भूमीपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते. मात्र, काही काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी रस्त्या येणाऱ्या जागा भूसंपादनासाठी महापालिकेला अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली.

त्यामुळे काही वर्षे काम रखडले होते. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या वर्षी मार्च महिन्यात चांदणी चौकात वाहतूक कोंडीत अडकले होते. त्यानंतर त्यांनी या परिस्थितीची पाहणी करीत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना हा मार्ग पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर या उड्डाणपुलासह रस्त्यांच्या कामांना गती आली.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *