मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून चढउतार पाहायला मिळत आहेत, पण देशातील सर्वात मौल्यवान कंपनीचे शेअर सुस्साट धावत आहेत. मंगळवारी, शेअर बाजारात चांगली तेजीसह व्यवहार होत असताना देशातील सर्वात मोठ्या मौल्यवान कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला सर्वाधिक फायदा झाला असून कंपनीच्या शेअरने उंच भरारी घेतली आणि नव्या उच्चांकावर मुसंडी मारली.

रिलायन्स कंपनीने रचला इतिहास
अब्जधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजचे (RIL) शेअर आज २० लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवलचा पल्ला गाठणारी पहिली सूचीबद्ध भारतीय कंपनी ठरली आहे. मंगळवारी बीएसईवर कंपनीच्या स्टॉकचा १.८९% उसळी घेत भाव ५२ आठवड्याच्या उच्चांक २,९५७.८० रुपयांवर उसळला. तसेच गेल्या दोन आठवड्यांतच शेअरचे बाजारमूल्य एक लाख कोटी रुपयांनी वाढले असून चालू कॅलेंडर वर्षात आतापर्यंत भारतातील सर्वात मूल्यवान शेअरची किंमत सुमारे १४ टक्क्यांनी वधारले आहे.

गेल्या महिन्यात २९ जानेवारीला कंपनीने बाजार मूल्य १९ लाख कोटी रुपयांवर होते. याशिवाय चालू कॅलेंडर वर्षात आतापर्यंत, भारतातील सर्वात मौल्यवान स्टॉकची किंमत जवळपास १४ टक्क्यांनी वधारली आहे. १३ फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या व्यापारात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने मागील बंद किंमतीपेक्षा जवळपास २% झेप घेतली आणि २,९५७.८० रुपयांच्या नवा उच्चांक नोंदवला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप नोव्हेंबर २०१९ मध्ये १० लाख कोटी रुपये आणि सप्टेंबर २०२१ मध्ये १५ लाख कोटी रुपये होते.
पेटीएमवर आरबीआय गव्हर्नरांचे मोठे वक्तव्य, पेटीएम पेमेंट बँकेला दिलासा मिळण्याची आशा संपली
देशातील मौल्यवान कंपनी कोणती?
ॲक्सिस बँकेच्या खाजगी बँकिंग युनिट बरगंडी प्रायव्हेट आणि हुरुन इंडिया यांनी संयुक्तपणे देशातील सर्वात मौल्यवान कंपन्यांची यादी तयार केली आहे. बरगंडी प्रायव्हेट आणि हुरुन इंडिया 500 च्या अहवालात रिलायन्स इंडस्ट्रीजचे नाव आघाडीवर असून या यादीत समाविष्ट कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य २३१ लाख कोटी रुपये आहे.
बाजारात येताच रिटर्न मशीन बनला शेअर, छोटूराम स्टॉकने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
बाजार भांडवलाच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज पुन्हा एकदा देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली असून त्यांच्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (TCS) मार्केट कॅप १५.०७ लाख कोटी रुपये आणि एचडीएफसी बँक तिसऱ्या क्रमांकावर आहे. या अहवालानुसार एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँकेने मानाचे स्थान मिळवले असून विलीनीकरणानंतर बँकेचे बाजार भांडवल १० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले.

Read Latest Business News

(Disclaimer: येथे देण्यात आलेला तपशील केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी मार्केट एक्सपर्टचा सल्ला अवश्य घ्या. महाराष्ट्र टाइम्स कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचे समर्थन करत नाही.)Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *