[ad_1]

२०१० मध्ये केलं दणदणीत पदार्पण

२०१० मध्ये केलं दणदणीत पदार्पण

तिचा चाहता वर्ग आता केवळ तेलगू चित्रपटसृष्टीपुरताच मर्यादित राहिला नसून हिंदी पट्ट्यातही ती प्रसिद्ध आहे. सामंथाने गौतम वासुदेव मेनन यांच्या ये माया चेसावे (२०१०) या तेलगू चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. २०१० मध्ये आलेला ‘ये माया चेसावे’ रिलीज होण्यापूर्वीच लोकांमध्ये लोकप्रिय झाला होता. कारण गौतम मेनन आणि संगीतकार ए आर रहमान यांच्याबद्दल चाहत्यांमध्ये खूप उत्साह होता कारण दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करत होते.

अनेक मेगास्टार्ससोबत केलं काम

अनेक मेगास्टार्ससोबत केलं काम

ऑडिशन देऊन सामंथा या प्रोजेक्टचा भाग झाली होता. हा चित्रपट भारत आणि अमेरिकेत शूट करण्यात आला आणि २६ फेब्रुवारी २०१० रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये सामंथा तिचा पूर्वाश्रमिचा पती नागा चैतन्यसोबत दिसली होती. काही वर्षांत सामंथा बिग बजेट चित्रपटांचा भाग बनू लागली. सामंथाने महेश बाबू, सिद्धार्थ, पवन कल्याण इत्यादी अनेक स्टार्ससोबत काम केले. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही की सामंथा आता एक फार मोठी स्टार आहे.

मॉडेलिंगचा काळ होता सर्वात कठीण

मॉडेलिंगचा काळ होता सर्वात कठीण

मात्र चित्रपटसृष्टीत स्टार होण्याआधी तिला खूप संघर्षांचा सामना करावा लागला होता. चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर सामंथाने मॉडेलिंगला सुरुवात केली. मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये सामंथासाठी उदरनिर्वाह करणे सोपे नव्हते आणि अनेकदा ती दिवसातून एकदाच जेवायची. याचा खुलासा तिने स्वतः एका शोमध्ये केला होता. केवळ चित्रपटच नाही तर आता सामंथाने वेब सीरिजमध्येही अभिनय करण्यास सुरुवात केली आहे. अॅमेझॉन प्राइमच्या सुपरहिट शो फॅमिली मॅन- २ मधून तिने मनोज बाजपेयीसोबत ओटीटीवर पदार्पण केले.

स्वतःच्या आरोग्यावर घेतेय मेहनत

स्वतःच्या आरोग्यावर घेतेय मेहनत

सामंथा आता चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे पण सध्या आरोग्याच्या समस्यांमुळे ती चित्रपटांपासून दूर आहे. अलीकडेच, अभिनेत्रीबद्दल असे म्हटले जात होते की तिने तिच्या मायोसिटिसच्या उपचारासाठी एका मोठ्या स्टारकडून २ कोटी रुपये घेतले होते, परंतु नंतर सामंथाने ही बातमी अफवा असल्याचे स्पष्ट केले. ‘मी कामाच्या बदल्यात पैसा कमावला आहे, दगड नाही. मला कोणाच्याही पैशांची गरज नाही आणि माझ्या मेहनतीचा चांगला पैसा इंडस्ट्रीने मला दिला आहे.’

आध्यात्माची ओढ

आध्यात्माची ओढ

रिपोर्ट्सनुसार, सामंथाची एकूण संपत्ती १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अभिनेत्रीने तिच्या तब्येतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सहा महिन्यांचा ब्रेक घेतला आहे कारण ती लवकरच अमेरिकेत मायोसिटिस या तिच्या आजारावर उपचार घेणार आहे. दरम्यान ती आपल्या सर्वात जवळच्या मैत्रिणीसोबत जगभ्रमंती करत आहे. याचे काही फोटो आणि व्हिडिओही तिने सोशल मीडियावर शेअर केले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *