[ad_1]

मुंबई: अभिनेत्री दीपा परबची मुख्य भूमिका असणारी ‘तू चाल पुढं’ ही झी मराठीच्या लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका आहे. या मालिकेने अल्पावधीच चांगला प्रेक्षकवर्ग कमावला आहे. केवळ दीपाच नव्हे तर या मालिकेत काम करणाऱ्या सर्व कलाकारांचे चाहते आहेत. दरम्यान या मालिकेला एका लोकप्रिय अभिनेत्रीने राम राम केल्याचे समोर आले आहे. या अभिनेत्रीने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत तिची मालिकेतील भूमिका संपल्याचे जाहीर केले.

‘तू चाल पुढं’ ही मालिकेत प्राजक्ता पांडे ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने मालिका सोडली आहे. ही भूमिका अभिनेत्री स्नेहा माजगावकर साकारत असून तिने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत ती आता या मालिकेत यापुढे दिसणार नसल्याचे सांगितले. अभिनेत्रीने मालिकेच्या सेटवरील फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

Tharla Tar Mag: प्रियाचं सीक्रेट बाहेर येणार की अर्जुन-सायलीचं? एका कॉलने घातला मोठा गोंधळ
‘यादों की अलमारी, Being Praju’ असं कॅप्शन देत स्नेहाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिचे सहकलाकार आणि मालिकेच्या क्रू मेंबरसोबतचे अभिनेत्रीचे फोटो आहेत, शिवाय सेटवरील आनंदी क्षणही या व्हिडिओत आहेत. अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करताना असंही म्हटलं की, ‘सीरिअल संपत नाहीये मी या पुढे सीरियल मधे नसेन’.


तिने मालिकेच्या सेटवरील शेवटच्या दिवसाचेही फोटो शेअर केलेत. त्याचप्रमाणे तिच्या चाहत्यांकडूनही काही व्हिडिओ शेअर करण्यात आले आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टनंतर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. अभिनेत्री या मालिकेचा महत्त्वाचा भाग असल्याने तिच्या जाण्याने चाहत्यांना आश्चर्य वाटले आहे. अनेकांनी कमेंट करत यापुढे मालिकेत प्राजूला मिस करू अशा कमेंट केल्या आहेत.


विशाखाच्या आयुष्यात आलंय मोठं वादळ, देशमुखांच्या घरातील आणखी एक घटस्फोट अरुंधती थांबवू शकेल?
तू चाल पुढं या मालिकेत अश्विनी या मुख्य भूमिकेत दीपा परब आहे. दीपाने दीर्घ कालावधीनंतर या मालिकेद्वारे पुनरागमन केले. याशिवाय या मालिकेत धनश्री कोडगावकर साकारत असलेल्या ‘शिल्पी’ या भूमिकेचंही विशेष कौतुक होतं. या मालिकेत आदित्य वैद्य, धनश्री कोडगांवकर, पीहू गोसावी, देवेंद्र दोडके या कलाकरांच्याही मुख्य भूमिका आहेत.

सचिनसोबत व्हिडिओ कॉल, दीपा परबचं स्वप्न पूर्ण[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *