[ad_1]

मुंबई: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतला लोकप्रिय कन्नड अभिनेता आणि डान्स कर्नाटक डान्सचा परिक्षक विजय राघवेंद्र याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आयुष्यभर एकत्र राहून एकमेकांना साथ द्यायची असं स्वप्न त्यानं आणि त्याच्या पत्नीनं पाहिलं होतं.पण आता पत्नीनं अर्ध्यावरच साथ सोडली. कधीही न संपणारं दु:ख त्याच्या वाट्याला आलंय. नुकतंच त्याच्या पत्नीनं निधन झालं.

विजय राघवेंद्रच्या पत्नीचं नाव स्पंदना असं होतं. सोमवारी हृदयविकाराच्या झटक्यानं तिचं निधन झालं. नुकतेच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्नीला अखेरचा निरोप देताना विजय राघवेंद्र हे दु:ख लपवू शकला नाही. पत्नीला अखेरचा निरोप देताना त्याला हुंदका आवरता आला नाही. रडून त्यानं त्याचं दु:ख व्यक्त केलं. त्याचे व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहेत.
लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीचा धक्कादायक मृत्यू; हार्ट अटॅकमुळे गमावला जीव
साऊथ इंडस्ट्रतीला स्टार अभिनेता यश यानं देखील विजय राघवेंद्रच्या पत्नीचं अंतिम दर्शन घेतलं. मित्राचं सांत्वन करताना तो दिसला. यश जेव्हा विजय राघवेंद्रला भेटण्यासाठी गेला तेव्हा विजय राघवेंद्रला हुंदका आवरला नाही. मित्राला असं पाहून यश देखील त्याला आधार देताना दिसतोय. सोशल मीडियावरचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी भावुक अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, स्पंदनाच्या निधाननं विजय राघवेंद्रच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. स्पंदना सुट्टीसाठी बँकॉकला गेली होती, तिथंच तिला हृदयविकाराचा झटका आणि तिचं निधन झालं. तिच्या पश्चात पती विजय राघवेंद्र आणि मुलगा शौर्य असा परिवार आहे. स्पंदनाचं बॅंकॉमध्ये होती तर, राघवेंद्र बंगळुरूत सिनेमाचं प्रमोशन करत होता. पत्नीच्या निधनाची बातमी येताच त्याला मोठा धक्काच बसला.

अर्ध्यावरती डाव मोडला..
स्पंदनाच्या निधाननं विजय एकटा पडला आहे. याच महिन्यात ते दोघे त्यांच्या लग्नाचा १६ वा वाढदिवस साजरा करणार होते. २००७मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली होती.स्पंदना ही माजी पोलीस अधिकारी शिवराम यांची मुलगी होती. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या रविचंद्रन यांच्या ‘अपूर्व’ सिनेमात तिनं पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. हा तिचा कन्नड सिनेविश्वातील पहिलाच सिनेमा होता.

मुलीनं खांदा दिला, एनडी स्टुडिओ हळहळला ; नितीन चंद्रकांत देसाईंना अखेरचा निरोप

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *