[ad_1]

नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये संसदेचं विशेष अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या निमित्तानं देशातील विविध राजकीय पक्षांचे खासदार राजधानीत दाखल झालेले आहेत. विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस संसदेच्या जुन्या इमारतीत पार पडला. आजचा नव्या संसदेतील कामकाजाचा पहिला दिवस होता. या दिवसाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. प्रफुल पटेल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजेच ट्विटरवर दोन फोटो शेअर केले आहेत. त्यामुळं राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

शरद पवार प्रफुल पटेलांचा एकत्र फोटो

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै २०२३ रोजी गट पडले. अजित पवार यांच्या गटानं भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सरकारमध्ये प्रवेश केला. खासदार प्रफुल पटेल यांची यामध्ये महत्त्वाची भूमिका होती, असं म्हटलं जातं. प्रफुल पटेल यांनी दरम्यानच्या काळात शरद पवार यांच्यावर देखील राजकीय टीका केली होती. मात्र, नव्या संसद भवनातील कामकाजाच्या सुरुवातीच्या निमित्तानं दोन्ही नेत्यांचा एकत्रित फोटो प्रफुल पटेल यांनी शेअर केला. यासोबत महाराष्ट्रातील इतर खासदारांसोबतचा फोटो देखील प्रफुल पटेल यांनी शेअर केला आहे.
JEE NEET Exam Dates: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, जेईई, नीटच्या तारखा जाहीर, जाणून घ्या वेळापत्रक

प्रफुल पटेल काय म्हणाले?

नव्या संसदभवनातील ऊर्जादायी दिवस, राज्यसभेतील चेंबर आश्चर्यचकीत करणार आहे. हा क्षण सर्वांसोबत शेअर करत असताना शरद पवार यांची उपस्थिती आणखी विशेष आहे, असं प्रफुल पटेल म्हणाले.

दरम्यान, राज्यसभेतील इतर खासदारांसोबतचा फोटो देखील प्रफुल पटेल यांनी शेअर केलेला आहे. या फोटोत शरद पवार, वंदना चव्हाण, रजनीताई पटेल, प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह इतर खासदार देखील दिसतात.

अनंतनागमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणावरील जळालेला मृतदेह उजैर खानचा? घरातील सदस्यांचे घेतले सँपल, DNA चाचणी होणार
संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आज केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक सादर केलं आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास लोकसभेत आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत मांडलं, अंमलबजावणी कधीपासून होणार?

देशाच्या नावावरून पेटलेल्या वादावर हल्लाबोल, ठाकरेंच्या खासदाराचं जुन्या संसदेतील शेवटचे भाषण!



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *