पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. राज ठाकरे हे आज विघ्नहर चरणी नतमस्तक झाले. या दौऱ्यात त्यांनी श्रीक्षेत्र ओझर येथे त्यांनी दर्शन सभा मंडप आणि भक्ती शक्ती शिल्पाचे लोकार्पण देखील केले. यावेळी त्यांनी विघ्नहर गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणपतीला अभिषेक देखील केला.

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर दौरे सुरू केले आहेत. आज सकाळीच राज ठाकरे ओझर येथे दाखल झाले. भर सकाळी त्यांनी ओझर मंदिर परिसराची पाहणी देखील केली. राज ठाकरे यांनी गणपतीला अभिषेक करत दर्शन घेतले. मनसे पदाधिकारी यावेळी मोठ्या संखेने उपस्थित होते.
विखेंच्या पॅनलचा सुपडासाफ, भाजप नेत्याकडूनच ‘परिवर्तन’, म्हणतात शिर्डीत दबावाचं राजकारण बंद
पुण्यातून राज ठाकरे हे ओझर येथे दाखल झाले होते. त्यानंतर ते जुन्नर तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार असून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे हे मुंबईकडे रवाना होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी राज्यभरात दौरे सुरू केले असून विविध ठिकाणी कार्यक्रम करत आहेत. येत्या काही दिवसात मनसेकडून कुणाला उमेदवारी जाहीर होणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

गणपतीला अभिषेक, राज ठाकरेंनी ओझर गणपतीचे दर्शन घेतले

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

ओझर येथे भक्ती शक्ती शिल्प साकारण्यात येणार असून भाविकांसाठी ते एक पर्वणी असणार आहे. राज ठाकरे यांनी अनेक जिल्ह्यात आणि गावोगावी भेटी देत आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्याने जुन्नर तालुक्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना उत्साह निर्माण झाला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसे किती जागा लढवणार हे अद्याप तरी समोर आले नसले तरी राज ठाकरे यांच्या दौऱ्यातून लोकसभेची जय्यत तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *