रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी आणि सध्या ठाकरे गटात असलेले माजी आमदार संजय कदम तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यात राजकीय वैमानस्य सर्वज्ञात आहे. संजय कदम यांच्यावर रामदास कदम यांनी जोरदार टीका केली आहे. यांना मोठं कोणी केलं, यांचा राजकीय बाप मीच आहे. याच संजय कदम यांनी खेड येथील भरणा नाक्यात भगवा झेंडा पायाखाली घेऊन जाळला होता, त्याच दिवशी मी याला गाडण्याची शपथ घेतली होती, अशी घणाघाती टीका रामदास कदम यांनी केली आहे.
आधी साधं विचारत नव्हते, आता फोन करतायेत, अजितदादांचा पुन्हा शरद पवारांवर बोचरा वार
खेड आंबवली येथील कार्यक्रमात ते बोलत होते. संजय कदम यांना मोठं मी केलं. तुम्हाला पंचायत समितीचे तिकीट, जिल्हा परिषदेचे तिकीट, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि मग तू नशिबाने आमदार झालात. मी त्यावेळेला येथे सभा घ्यायला आलो नाही म्हणून तुमची औकात काय? तुम्ही आव्हान कोणाला देताय ? असा खडा सवालच रामदास कदम यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की, मी गेले अनेक वर्ष संघटनेचे काम करत असताना वीस वर्षे येथे आमदार होतो. आपले अनेक वर्षांचे संबंध आहेत. पण मी कधीही जात-पात धर्म पहिला नाही. या तालुक्यामध्ये मुस्लिम बांधवांसह सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आणि विकासकामे करण्याचे काम हे तुमच्या रामदास कदमने केलं आहे, असं ते कार्यकर्त्यांना म्हणाले.

रामदास कदम पुढे म्हणाले की, येथे राव आणि पाटील यांच्यात भांडण लावायची. कटूता निर्माण करायची आणि मग राजकीय पोळी आपण भाजून घ्यायची, हे धंदे सध्या सुरू आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनी सावध असले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितलं. यांच्या हातामध्ये काही नाही हे पिल्लं कुठली या पिल्लाना मीच मोठं केले आहे. यांच्या पायात चपला नव्हत्या. पाठीला ठिगळ लावलेले कपडे होते. हे आज आमदार वगैरे माजी आमदार झाले. यांना मोठा कोणी केला मीच केला, असाही टोला रामदास कदम यांनी लगावला आहे.

अजित पवारांना निखिल वागळे दादा म्हणाले, कार्यकर्ते म्हणाले आता रोहित पवारच दादा !

यावेळी त्यांनी आमदार सुपुत्र योगेश कदम यांच्या कामाचे कौतुक केलं. बाप से बेटा सवाई हे मी आज अनुभवतो आहे की बापापेक्षा बेटा अधिक चांगलं काम करतोय, असं म्हणत त्यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार योगेश कदम यांचेही कामाचं कौतुक केलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *