ठाणे (कल्याण) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सोमवारी कल्याण दौऱ्यावर येत असून उल्हासनगर येथे एल्गार परिषदेत उपस्थित राहणार आहेत. पक्षाचा ताबा आणि चिन्ह गेल्यानंतर प्रथमच पवार हे कल्याण येथे येत आहेत. शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी ऍक्टिव्ह झालेली पहायला मिळत आहे. नुकतेच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे येथे येऊन गेले आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार हे देखील येथे येऊन सत्ताधाऱ्यांवर काय नक्की बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

तर उद्या म्हणजे १२ तारखेला संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही कल्याण पश्चिमेत येणार असून विविध विकास कामाची उदघाट्न करणार आहेत. त्यामुळे आजी आणि माजी मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

असा असणार दौरा…
१) दुपारी १६.२० वा बिर्ला स्कूल कल्याण (प) येथे हेलिकॉप्टरने आगमन

२) १६.३५ वा स्प्रिंग टाइम क्लब खडकपाडा कल्याण पश्चिम येथे आगमन व प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट व स्वागत

३) १७.२० वा उल्हासनगरच्या दिशेने रवाना.

४ १७.४० वा नेताजी चौक उल्हासनगर येथे कार्यकर्त्यांकडून स्वागत.

६) १७५० वा दसरा मैदान उल्हासनगर येथे एल्गार परिषदेत उपस्थिती….

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘या’ प्रकल्पांचे उद्घाटन
१) सिटी पार्क योगिधाम

२) कै. दिलीप कपोते वाहनतळ

३) BSUP उंबर्डे येथील घरांचे वाटप आचार्य अत्रे नाट्यगृह

४) अग्निशामक दलचे उद्घाटनSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *