[ad_1]

जालना : मराठा आरक्षणाच्या ठोस भूमिकेमुळे साऱ्या महाराष्ट्रासह देशात नाव झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा ११ वा दिवस. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी घडलेल्या लाठीमाराच्या दुर्दैवी घटनेनं अंतरवाली सराटी या गावाचं नाव राज्यासहीत देशात पसरलं आणि मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी खासदार,आमदार, मंत्री, पदाधिकारी कार्यकर्ते अशा सगळ्यांनी अंतरवाली सराटी गाठली. आपल्या राहत्या घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या या गावात मनोज जरांगे उपोषणाला बसले तेव्हापासून मनोज आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट झाली नव्हतीच. आज मनोज यांच्या आईने उपोषणस्थळी भेट दिली आणि त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.

आज न राहून मुलाच्या जिवाच्या काळजीने मनोज जरांगे यांच्या आईने उपोषणस्थळ गाठलं आणि पोराला पाहून त्या भावनाविवश झाल्या. मुलाला डोळे भरून पाहिल्यावर त्यांना बरं वाटलं. आई भेटायला आली म्हटल्यावर मनोज यांना अजून हुरूप आला. आई व्यासपीठावर दाखल होताच जरांगे यांनी त्यांचे आशीर्वाद घेत गळाभेट घेतली, तर यावेळी त्यांच्या आईला देखील हुंदके आवरता आले नाही. उपस्थित असलेल्या महिलांनी त्यांच्या आईला धीर देत त्यांना आधार दिला. माझ्या पोराला न्याय द्यावा, अशी मागणी मनोज यांच्या आईने यावेळी केली.

संभाजीराजेंनी सरकारला थेट सुनावले; …अन्यथा समाजाची पुन्हा फसवणूक करू नका

दरम्यान, यापुढे आरक्षणासाठी मराठा समाजाचा एकही मुडदा पडू देणार नाही, हे आंदोलन मराठ्यांच्या कोट्यवधी पोरांचं कल्याण करेल असा शब्द यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मराठ्यांच्या पदरात आरक्षणाचं दान टाकल्याशिवाय शांत बसणार नाही, असा विडा मी उचलल्याचं देखील ते म्हणाले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *