पुणे : लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या असताना भाजपने पुणे मतदारसंघासाठी आपली ताकद पणाला लावली आहे. भाजपमधून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह सुनील देवधर यांचे नावे प्रामुख्याने पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी चर्चेत आहे. भाजपच्या या तिन्ही नेत्यांमध्ये जनसंपर्क वाढवण्यासाठी सध्या इव्हेंट वॉर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, एकीकडे मुळीक आणि मोहोळ यांच्या कार्यक्रमाला भाजप नेते हजेरी लावताना दिसत आहेत तर दुसरीकडे देवधर मात्र एकाकी पडल्याचे चित्र आहे.

श्रीराम जन्मभूमीसाठी सुरू असलेल्या तब्बल ५०० वर्षांच्या संघर्षाची यशस्वी पूर्तता करून श्रीक्षेत्र अयोध्या येथे भव्य अशा राम मंदिराची उभारणी करण्यात आली. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कार्याचे अभिनंदन करण्यासाठी ‘नमो पुणे अभिवादन’ या भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले होते. याचं नियोजन भाजपचे लोकसभा इच्छुक असलेले सुनील देवधर यांनी केले होते. पण या आयोजनापासून स्थानिक भाजप नेत्यांनी लांब राहणं पसंत केलं आहे.

सुनील देवधर यांच्याकडून मागील काही काळापासून सांस्कृतिक कार्यक्रम, पुरस्कार सोहळे यांचं आयोजन केलं जात आहे. या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कार्याचे अभिनंदन करण्यासाठी ‘नमो पुणे अभिवादन’ या भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले होते.

भाजप कार्यालय, कृष्णसुंदर गार्डन, डीपी रोड, एरंडवणे येथून या रॅलीला सुरुवात झाली. याप्रसंगी भाजपचे युवा नेते कुणाल टिळक, राजे शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भाजप शहर चिटणीस महेश पवळे आणि दिनेश होले वगळता कोणतेही महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याच्या गौरव करण्यासाठी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्येच पुण्यातील भाजपचे मुख्य पदाधिकारीच नसल्याने हा शहरात चर्चेचा विषय बनला आहे.
विखेंच्या पॅनलचा सुपडासाफ, भाजप नेत्याकडूनच ‘परिवर्तन’, म्हणतात शिर्डीत दबावाचं राजकारण बंद
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुणे लोकसभा निवडणुक लढवण्यास इच्छुक असलेल्या भाजपा नेत्यांमध्ये इव्हेंट वॉर रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजप इच्छुक माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याकडून आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचा धडाका लावण्यात आला आहे. या माध्यमातून आपण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे दावा या इच्छुकांकडून करण्यात येत आहे. तसेच या कार्यक्रमांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना बोलून आणि प्रचंड गर्दी जमा करून एक प्रकारे शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून आपला दावा मजबूत करण्याचं काम या इच्छुकांकडून करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

भाजपमध्ये येण्यासाठी एकनाथ खडसेंचे जोर लावून प्रयत्न सुरु; मंत्री गिरीश महाजनांचा मोठा दावा

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

मात्र, दुसरीकडे सुनील देवधर यांनी देखील आपण लोकसभेचा दावेदार असल्याचे बोलून दाखवल्यानंतर त्यांच्या कार्यक्रमाकडे शहर भाजपचे पदाधिकारी फिरायला तयार नाहीत. इतकंच नाही तर सुनील देवधर यांच्या कार्यक्रमाला राज्यातील वरिष्ठ नेत्यांची सुद्धा गैरहजेरी पाहायला मिळत आहे. एकीकडे पुणे शहराला बाहेरचा उमेदवार नको अशी कुजबूत सध्या शहर भाजपा अंतर्गत सुरू आहे. कदाचित त्याचाच फटका सुनील देवधर यांना बसत असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *