[ad_1]

पुणे : पुण्यातील औंध परिसरात एकावर गोळीबार करून हल्लेखोराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. अनिल ढमाले, असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढमाले याने आकाश जाधव याच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये आकाश हा गंभीर जखमी झाला असून त्यास ज्युपिटर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.त्यानंतर ढमाले ते रिक्षाने चतु:शृंगीकडे येत असताना काही अंतर येऊन स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. हा सर्व प्रकार आर्थिक देवाण-घेवाणीमधून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. व्यावसायिक वादातून ढमालेने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. अद्याप पोलिसांकडून अधिकृतरित्या माहिती मिळालेली नाही.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *