संजय घारपुरे : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने एक अप्रतिम झेल पकडला होता. पण इंग्लंडचा खेळाडू हा बाद होता, तरी त्याला नॉट आऊट ठरवण्यात आले. क्रिकेटचा याबाबतचा नियम नेमका काय सांगतो, हे आता समोर आले आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयाच्या समीप पोहोचला होता. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातील चौथ्या दिवशी भारताच्या विजयानंतरही टॉम हार्टलीविरुद्ध झालेल्या अपीलची, पंचांनी फेटाळलेल्या अपीलची आणि त्यानंतर घेण्यात आलेल्या डीआरएसची चर्चा जास्त झाली. भारतीयांचे अपील झेलबादबाबत होते. त्यामुळे त्याला रिप्ले पाहून पायचीत ठरवता येणार नाही, असा निर्णय देण्यात आला.

अश्विनच्या गोलंदाजीवर हार्टली झेलबाद असल्याचा निर्णय पंचांनी दिला. हार्टलीने त्याविरोधात दाद मागितली. टीव्ही रिप्लेमध्ये चेंडू हार्टलीच्या ग्लोव्हजला नव्हे, तर हाताला लागला असल्याचे दिसले. दूरचित्रवाणी पंचांनी हार्टली पायचीत आहे का, याचीही तपासणी केली. त्यात हार्टली बाद असल्याचे दिसले. मात्र, दूरचित्रवाणी पंचांनी निर्णय पंच देतील, असा निर्णय दिला. दूरचित्रवाणी पंचांनी आयसीसीने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार सर्व प्रकारची पाहणी केली होती; पण निर्णय घेतला नव्हता. मैदानावरील पंचांनी हार्टलीविरुद्धचे अपील फेटाळले.

भारतीय खेळाडूंनी पंच गॅफानी यांच्यासह चर्चा केली; पण पंच आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी अपील झेलबादचे होते. हार्टलीने दादही झेलबादच्या निर्णयाविरुद्धच मागितली होती. त्यात चेंडू कुठेही हार्टलीच्या बॅट किंवा ग्लोव्हजला लागला नसल्याचे दिसले आहे. अपील झेलबादबद्दलचे होते, त्यामुळे त्याबाबतच निर्णय होईल, असे सांगून हार्टली याला पायचीत ठरवण्यास नकार दिला. कारण पंचांनी बाद दिले होते झेल बाद म्हणून, त्याचवेळी इंग्लंडने रव्ह्यू त्यासाठी घेतला होता. डीआरएसमध्ये तो झेल बाद आहे की नाही, हे पहिलं पाहिलं गेलं. तेव्हा तो नाबाद ठरला होता. त्यानंतर पंचांनी तो पायचीत आहे की नाही, हेदेखील पाहिलं. तेव्हा तो बाद असल्याचं दिसलं. त्यामुळे ज्यासाठी डीआरएस होता. त्यामुळे हार्टली जरी बाद असला तरी तो त्यापुढे खेळत राहीला.

रोहित शर्मा एअरपोर्टवर स्पॉट

क्रिकेटचे नियम हे ठरलेले आहेत. त्यामुळेच जेव्हा ही गोष्ट घडली तेव्हा संभ्रम झाला होता. पण त्यानंतर जेव्हा पंचांनी नियम सांगितले तेव्हा साऱ्या गोष्टी स्पष्ट झाल्या. त्यामुळे क्रिकेटच्या नियमांची पुन्हा उजळणी झाली आहे. त्यामुळे यापुढे जेव्हा अशा गोष्टी घडतील तेव्हा हे नियम सर्वांना स्पष्ट झालेले असतील.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *