[ad_1]

मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूक करताना नेहमीच तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी बोललं जातं. मार्केटमध्ये कधी बक्कळ नफा मिळतो, तर कधी पडझड झाल्यामुळे अक्षरशः सर्व गमवावं लागतं. म्हणूनच, स्टॉक मार्केटमधील गुंतवणूक धोक्याची बोलली जाते. पण, बाजारातील गुंतवणुक धोक्याची असली तरीही गुंतवणूकदारांची संख्या वाढतच चालली आहे. बाजारातील एखादा स्टॉकच गुंतवणूकदारांचे नशीब बदलण्यासाठी फायदेशीर ठरतो आणि गुंतवणूकदारांना दीर्घकाळ, तर अल्पावधीतच श्रीमंत केलेले अनेक शेअर्स आहेत. असाच एक मल्टीबॅगर स्टॉक म्हणजे, सूरज प्रोडक्ट्स शेअर ज्याने अवघ्या चार वर्षात मल्टीबॅगर परतावा दिला.चार वर्षात गुंतवणूकदार मालामालमल्टीबॅगर स्टॉकबद्दल बोलायचे तर बाजारातील लार्जकॅप आणि स्मॉलकॅप शेअरमध्ये सुरज प्रोडक्ट्सचा शेअर एकदम खास आहे, जो अल्पावधीतच मल्टीबॅगर ठरला आहे. मागील चार वर्षात या स्टॉकने ५४०० टक्के परतावा दिला असून या काळात कंपनीच्या शेअरची किंमत ८ रुपयांवरून ४४४.४० रुपयेपर्यंत वाढली आहे. अशाप्रकारे गेल्या चार वर्षातील कामगिरी पाहिल्यास जर एखाद्या गुंतवणूकदाराने शेअरमध्ये फक्त एक लाख रुपये गुंतवले असतील आणि कायम ठेवले असतील तर ते आत्ता ५५ लाख रुपये झाले असतील.गेल्या पाच वर्षातील कामगिरी पाहा…सुरज प्रॉडक्ट शेअरच्या कामगिरीनुसार गेल्या चार वर्षात जवळपास ५,४०० टक्के गुंतवणूकदारांचे खिसे भरले असून पाच वर्षात २,१४४.४४ टक्के परतावा दिला आहे. याशिवाय गेल्या एक वर्षात या मल्टीबॅगर स्टॉकने बीएसईवर १३५ रुपयांवरून ४४४.४४ रुपयांपर्यंत मुसंडी मारली आहे. म्हणजे मागील वर्षभरात शेअरची किंमत सुमारे २३० टक्क्यांनी वाढली आहे. इतकेच नाही तर गेल्या सहा महिन्यांत सूरज प्रॉडक्ट्सच्या स्टॉकची किंमत ९६% हून अधिक वधारले आणि २१८.६५ रुपयांवरून ४४४.४० रुपयांपर्यंत वाढली.कंपनीचा व्यवसाय काय?लोह उत्पादकांची कंपनी सुरज प्रोडक्ट्स लिमिटेड स्पंज आणि पिग आयर्न पुरवते. भारतभर व्यवसाय करणाऱ्या या कंपनीच्या विशेष उत्पादनांमध्ये TMT बार (TMT वॉर), स्पंज आयरन (स्पंज आयरन), पिग आयरन आणि एमएस इनगॉट/बिलेट यांचा समावेश असून कंपनीचे बाजार भांडवल ५०६.६२ कोटी रुपये आहे. याशिवाय कंपनीच्या कामाच्या स्टॉकवर प्रभाव होत असून गुंतवणूकदारांसाठी सतत फायदेशीर ठरत आहे.(Disclaimer: येथे शेअरच्या कामगिरीबाबत माहिती देण्यात आली आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटची गुंतवणूक धोक्याच्या अधीन असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी सल्लागाराशी बोला. तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्र टाइम्स जबाबदार राहणार नाही.)

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *