[ad_1]

भोपाळ: मध्य प्रदेशातील लोकायुक्तांच्या पथकानं काळा पैसा कमावणाऱ्या कुबेरांचा पर्दाफाश केला आहे. लोकायुक्त भोपाळच्या पथकानं मंगळवारी पहाटे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवणाऱ्या एका निवृत्त स्टोअर कीपरशी संबंधित जागांवर छापे टाकले. त्याच्याकडे १० कोटी रुपयांपेक्षा अधिकची माया सापडली.

निवृत्ती घेतलेल्या स्टोर कीपरकडे त्याच्या उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याची तक्रार मिळाली होती. त्या तक्रारीच्या आधारे भोपाळ आणि विदिशा जिल्ह्यातील लटेरीतील घरांवर आणि विविध ठिकाणच्या मालमत्तांवर छापे टाकण्यात आले. त्यातून लोकायुक्तांच्या पथकाच्या हाती १० कोटी रुपयांपेक्षा अधिकची संपत्ती आढळून आली.

लोकायुक्त एसपी मनु व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार, लटेरीमध्ये वास्तव्यास असणारे अशफाफ अली राजगढच्या जिल्हा रुग्णालयात स्टोर कीपर म्हणून काम करायचे. त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा अधिकची संपत्ती असल्याची तक्रार मिळाली होती. त्यानंतर भ्रष्टाचार निवारण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
प्रेयसीची पिझ्झा खाण्याची इच्छा, तो लगेच पोहोचला; पण ‘दबक्या पावलांनी’ जीव घेतला, काय घडलं?
कुटुंबाच्या सदस्यांच्या नावावर १६ पेक्षा अधिक स्थावर मालमत्तांची माहिती मिळाली असून ५० हून अधिक जंगल मालमत्तांची तपासणी सुरू आहे. या मालमत्ता भोपाळ-विदिशा आणि लटेरीमध्ये आहेत. आरोपी आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावे असलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तांची कागदपत्रं सापडली आहेत. त्यांची किंमत जवळपास सव्वा कोटींच्या घरात आहे. या व्यतिरिक्त ५० हून अधिक स्थावर मालमत्तां लटेरी विदिशा आणि भोपाळमध्ये आहेत. त्यांची माहिती गोळा केली जात आहे.

अशफाक अली स्टोर कीपर पदावरुन निवृत्त झाला, त्यावेळी त्याचा पगार ४५ हजार रुपये होता, अशी माहिती लोकायुक्तांनी दिली. छापेमारीत सापडलेली संपत्ती, रोकड आणि दागिन्यांचं मूल्य अलीला त्याच्या नोकरीच्या कालावधीत मिळालेल्या वेतनाच्या कित्येक पट अधिक आहे. लटेरीमध्ये त्याच्या नावे १४००० चौरस फुटांचं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. त्याचं काम सध्या सुरू आहे.
‘हर हर शंभू’ गाणाऱ्या तरुणीच्या भावाला अज्ञातांनी संपवलं; गावाजवळ गाठून सपासप वार
लटेरीत एक तीनमजली इमारत सापडली आहे. त्यात शाळा चालवली जाते. छाप्यादरम्यान घरात ४६ लाख रुपयांचे दागिने आणि सोन्या चांदीसह २० लाखांची रोकड सापडली. ही रोकड एका बॅगमध्ये होती. ती मोजण्यासाठी मशीन मागवण्यात आली. भोपाळच्या एअरपोर्ट रोडवकील घरावर छापा टाकण्यात आला. घरातील आलिशान इंटरियर पाहून लोकायुक्तांच्या टीमला धक्काच बसला. या ठिकाणी मॉड्युलर किचन, लाखोंचं झुंबर, फ्रीज, टीव्हीसोबत महागडे सोफे आणि शोकेस सापडले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *