[ad_1]

भुवनेश्वर: ओडिशाच्या एका जिल्ह्यातील अनेक गावकरी रातोरात श्रीमंत झाले आहेत. एका अज्ञात स्त्रोतांकडून लोकांच्या बँक खात्यांमध्ये पैसे आले आहेत. सुमारे ४० बँक खात्यांमध्ये अचानक मोठी रक्कम जमा झाली. खातेदारांच्या मोबाईलवर हा मेसेज पोहोचताच त्यांना आनंद तर झालाच पण ही रक्कम कुठून आली, याबाबत संभ्रमही निर्माण झाला. यानंतर बँकेत पैसे काढण्यासाठी एकच गर्दी झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण केंद्रपारा जिल्ह्यातील औल ब्लॉकमधील ओडिशा ग्राम्य बँकेच्या बटीपाडा शाखेशी संबंधित आहे. आपल्या खात्यात मोठी रक्कम जमा झाल्याचे खातेदारांना समजताच त्यांनी ती काढण्यासाठी तातडीने बँक गाठली. यावेळी काही लोकांनी खात्यातून पैसे काढले. तर अनेक लोक रिकाम्या हाताने गेले.

Air Hostess Murder Case: हवाई सुंदरीचा जीव घेऊन आरोपीने स्वतःला संपवलं, केसचं पुढे काय होणार?
संशयास्पद वाटल्याने बँक अधिकाऱ्यांनी तात्पुरते पैसे काढणे बंद केले

खातेदारांच्या मोबाईलवर त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज आला होता. यामध्ये अनेक हजारांपासून ते दोन लाखांपर्यंतची रक्कम जमा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यानंतर लोकांनी तात्काळ पैसे काढण्यासाठी बँक गाठली. बँकेत लोकांची एकच गर्दी झाली होती. बँकेच्या अधिकाऱ्यांना लोकांची गर्दी पाहून खात्यात येणारी रक्कम संशयास्पद असल्याचं लक्षात येताच त्यांनी पैसे काढण्यास तात्पुरती बंदी घातली.

सात वर्षांपूर्वी प्लानिंग, सात पानी पत्र, खोलीभर मेसेज अन् मग हॉटेल चालकाने आयुष्य संपवलं
सुरुवातीला काही लोकांनी पैसे काढले, गर्दी वाढल्यावर संशय आला

सुरुवातीला बँकेत पोहोचलेल्यांना खात्यातून पैसे काढण्यात यश आलं. मात्र, बँकेत पैसे काढणाऱ्यांची गर्दी झाल्याने बँक अधिकाऱ्यांना संशय आला. यानंतर खात्यात जमा झालेल्या रकमेबाबत संशय आल्याने बँकेने तात्पुरते पैसे काढणे बंद केले. लोकांच्या खात्यात पैसे कुठून आले याचा तपास आता बँक अधिकारी करत आहेत.

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *