[ad_1]

मुंबई– लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहेत. क्रांती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांसोबत जोडलेली असते. ती तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यात ती तिच्या चिमुकल्या मुलींचे देखील व्हिडिओ शेअर करत असते. क्रांती आणि समीर यांना झिया आणि जायदा अशा जुळ्या मुली आहेत. ती बरेचदा तिच्या मुलींचे व्हिडीओ आणि किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र अनेकदा तिला सोशल मीडियावर मुलींच्या नावांबद्दल विचारणा होताना दिसते. आता समीर यांनी त्यांच्या मुलींच्या नावामागचं कारण सांगितलं आहे.

ट्रेडिशनल लूकमध्ये कियारा एअरपोर्टवर स्पॉट

क्रांतीने तिच्या मुलींची नावं झिया आणि जायदा का ठेवली याबद्दल चाहते विचारणा करत असतात. त्याबद्दल समीर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. समीर यांनी नुकतीच ‘खुपते तिथे गुप्ते’ मध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी आपल्या जुळ्या मुलींची नावं आणि त्यांची नावं ठेवण्यामागची कारणं सांगितली. जायदा नाव हे समीर यांच्या आईच्या नावावरून ठेवलंय. त्यांच्या आईचं नाव जायदा होतं. तर, झियाचं नाव समीर यांच्या आत्याच्या नावावरून ठेवलंय. समीर म्हणाले, ‘आत्याला कॅन्सर झाला होता आणि माझं आत्यावर खूप प्रेम होतं, त्यामुळे तिच्या नावावरून मुलीचं नाव ठेवलं.’


क्रांतीने २०१८ मध्ये जुळ्या मुलींना जन्म दिला होता. त्यांच्या मुली सध्या ५ वर्षाच्या आहेत. तर क्रांतीनेही मुलींसाठी अभिनयातून ब्रेक घेतला होता. आता ती पुन्हा एकदा ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात परीक्षकाच्या खुर्चीत दिसतेय.

जिला मुलगी म्हणायला नकार दिला; मृत्यूनंतर तिनेच सांगितला दादा कोंडकेंच्या संपत्तीवर हक्क[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *