[ad_1]

मुंबई: बॉलिवूड कलाकार आणि त्यांचे चाहते यांचं नातं खूपच जवळचं असतं. चाहत्यांमुळंच एखाद्या कलाकाराची लोकप्रियता कळते. या कलाकारांसोबत एखादा तरी फोटो असावा असं प्रत्येक चाहत्याला वाटत असतं, मात्र हे फोटो किंवा ऑटोग्राफ घेताना बऱ्याचदा चाहत्यांचे नियंत्रण सुटतं. असाच काहीसा प्रसंग अभिनेत्री तमन्ना भाटिया हिच्यासोबत घडला. पण असा प्रसंग घडल्यानंतर सेलिब्रिटींचा स्वत:वरचा ताबा सुटतो, ते प्रचंड चिडतात, भडकतात, असं पाहायला मिळतं. पण तमन्नानं मात्र असं काही केलं की तिचं कौतुक होत आहे.

तमन्नानं एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.तमन्नाची एक झलक पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली होती. पण या गर्दीत असा एक चाहताही होता की, त्यानं सिक्यॉरिटी यंत्रणा तोडून तमन्नाला भेटण्यासाठी तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर, या चाहत्यानं थेट तमन्नाचा हात पडकला. तमन्नालाही काही काळ नेमकं काय होतंय, हे सुचत नव्हतं. पण तिनं न चिडता, हा प्रसंग हाताळला.

अशा प्रसंगात अनेकगा सेलिब्रिटी चिडतात, संताप व्यक्त करतात, सिक्यॉरिटी वाल्यांना सुनावतात. पण तमन्नानं मात्र असं काही केलं, चाहत्यांनाही तिचं कौतुक वाटत आहे. तमन्नाच्या कृतीमुळं नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

चाहत्यानं तमन्नाचा हात पडकल्यानंतर तिच्या बॉडीगार्ड्सनी त्या चाहत्याला लगेचच लांब केलं. पण तमन्नानं हा प्रसंग अगदी शांतपणे हाताळला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय.

तमन्नाचा कॅज्युअल एअरपोर्ट लूक

तमनन्ना केरळमध्ये एका कार्यक्रमला हजेरी लावण्यासाठी पोहोचली होती. पोपटी रंगाच्या साडीत तमन्ना नेहमीप्रमाणे सुंदर दिसत होती. २० बॉडीगार्ड्स आजूबाजूला असताना एक चाहता, तमन्नाच्या जवळ पोहोचला आणि तिच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. तमन्ना या चाहत्यावर चिडली नाही. बॉडीगार्ड्स त्या चाहत्याला खेचत असताना तमन्नानं त्यांना थांबवलं. तमन्नानं चाहत्यालाही शांत केलं. त्याच्या सोबत तिनं सेल्फी देखील काढला आणि ती निघून गेली तमन्नाच्या अशा वागण्यामुळं खरं तर त्या चाहत्यालाही काय होतंय हे कळतं नव्हतं.
करण जोहर खोटं बोलतोय, आर्टिस्टचा आरोप; काय आहे नेमका आलियाच्या मेंदीचा वाद?

तमन्नानं चाहत्याला जी वागणूक दिली, त्याचं सगळेच कौतुक करत आहेत.

पाहा व्हिडिओ

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *