मुंबई– शाहरुख खान बॉलिवूड शिवाय त्याच्या चाहत्यांच्या हृदयावरही राज्य करतो याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी येत असतो. सध्या तो त्याच्या बहुप्रतिक्षित ‘जवान’ चित्रपटामुळे चर्चेत आहे, आज ७ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. शाहरुख सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांशी सतत जोडलेला असतो. अलीकडेच सुपरस्टारने त्याच्या ट्विटर हँडलवर #ASKSRK सत्र ठेवले होते. जिथे चाहत्यांनी विचित्र प्रश्न विचारुन त्याला भंडावून सोडले, पण अभिनेत्यानेही त्याला जशाच तशी उत्तर दिली. दरम्यान, शाहरुखचा एक मोठा चाहता पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. इतकंच नाही तर खुद्द शाहरुख खानही आश्चर्य व्यक्त केले होते.
त्याने #ASKSRK सत्रादरम्यान त्याच्या चाहत्याने स्वत:चा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तो ‘जवान’च्या अनेक तिकिटांमध्ये गुंडाळलेला दिसत आहे. तो डोक्यापासून पायापर्यंत तिकिटांनी झाकलेला आहे. हा चित्रपट तो कोणासोबत पाहणार आहे हेही चाहत्याने सांगितले.
त्याने #ASKSRK सत्रादरम्यान त्याच्या चाहत्याने स्वत:चा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तो ‘जवान’च्या अनेक तिकिटांमध्ये गुंडाळलेला दिसत आहे. तो डोक्यापासून पायापर्यंत तिकिटांनी झाकलेला आहे. हा चित्रपट तो कोणासोबत पाहणार आहे हेही चाहत्याने सांगितले.
जवान ३६ गर्लफ्रेंड आणि ७२ एक्स-गर्लफ्रेंडसोबत पाहणार
हा फोटो शेअर करताना, SRK च्या या जबऱ्या चाहत्याने सांगितले की, ‘मी सर जवानसाठी ऑडी बुक केली आहे. माझ्या ३६ गर्लफ्रेंड, ७२ एक्सगर्लफ्रेंड आणि ८० मित्रांसोबत जात आहे. #AskSRK @iamsrk’. त्याच्या या पोस्टलाही खूप पसंती दिली जात आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’बद्दल चाहत्यांमध्ये किती उत्साह आहे, हेही यावरून दिसून येते.
चाहत्याला शाहरुखने दिली अशी प्रतिक्रिया
आपल्या फेसबुक पेजवर ही पोस्ट रिट्विट करताना शाहरुख खानने लिहिले, ‘वाह भाई, तुमची जवानी चमकत आहे!!!’ हा हा मजा कर #जवान. अॅटली दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखसोबत नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोवर आणि दीपिका पादुकोण दिसणार आहेत.