म. टा. प्रतिनिधी, पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात मुख्य आरोपी गणेश मारणेला न्यायालयाने नऊ फेब्रुवारीपर्यंत ‘मकोका’ कोठडी सुनावली. गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार याच्यापासून शरद मोहोळच्या जीवाला धोका होता, असा पुरवणी जबाब मोहोळची पत्नी व फिर्यादींनी दिला आहे; तसेच मोहोळच्या खुनानंतर हल्लेखोरांनी ‘आम्ही गणेश मारणेची पोरे आहोत,’ असे म्हटल्याचे फिर्यादीत नमूद असल्याचे पुणे पोलिसांनी न्यायालयात सांगितले; तसेच या गुन्ह्याबाबतचा गोपनीय अहवाल न्यायालयात सादर केला.

मोहोळच्या खुनानंतर फरार झालेला आरोपी गणेश मारणेला पोलिसांनी बुधवारी रात्री संगमनेर येथे जेरबंद केले. या खून प्रकरणात पंधरा आरोपींसह गणेश मारणेवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मारणेला गुरुवारी विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या ‘मकोका’ न्यायालयात हजर करण्यात आले.

पुण्यात पुढील दोन दिवस हुडहुडी वाढणार! महाबळेश्वरपेक्षा पुणे गार, शहरात वातावरण कसं असेल?
‘मोहोळच्या खुनानंतर गणेश मारणे फरार झाला होता. या काळात तो कर्नाटकातील बेंगळुरू, तेलंगणातील हैदराबाद, ओडिशासह महाराष्ट्रातील तुळजापूर, सोलापूर, निपाणी अशा चार-पाच राज्यांत फिरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याबाबत तपास करायचा असून, यापूर्वी अटक आरोपी आणि मारणेची समोरासमोर चौकशी करायची आहे. त्यासाठी मारणेला ‘मकोका’ कोठडी देण्यात यावी,’ अशी मागणी तपास अधिकारी सुनील तांबे व विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली. मारणेच्या वतीने अॅड. राहुल देशमुख यांनी बाजू मांडली.

दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने मारणेला नऊ दिवस ‘मकोका’ कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सर्व आरोपींना आज (शुक्रवारी) मकोका न्यायालयात हजर करण्यात येणार असून, त्यासाठीचा अर्ज पोलिसांनी न्यायालयात सादर केला आहे.

जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रोसाठी तब्बल दोन कोटींचे डबे, नव्याने निविदा जाहीर, निविदेत काय?Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *