मुंबई : काँग्रेसला मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडल्यानंतर आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. मुंबई काँग्रेसमधील दोन बडे नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. मुंबईतील युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि बांद्राचे आमदार आणि माजी आमदार अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यानंतर झीशान सिद्दिकी हे त्यांच्या पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा वरिष्ठांकडे सोपवून अजित पवार गटात प्रवेश करु शकतात, असं वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं दिलेलं आहे. सिद्दिकी यांच्याकडून या संदर्भात अजून कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

काँग्रेसला दुसरा धक्का

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरु झाली त्याच दिवशी मुंबईतील काँग्रेसचे माजी आमदार मिलिंद देवरा यांनी पक्षाचा राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये होणार आहे. २० मार्च रोजी हा समारोप होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसला दुसरा धक्का बसणार आहे. नेते माजी आमदार बाबा सिद्दिकी १० फेब्रुवारीच्या दरम्यान अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यानंतर झीशान सिद्दिकी युवक काँग्रेस अध्यक्ष पदाचा आणि त्यानंतर आमदारकीचा राजीनामा देऊन अजित पवार गटात जाऊ शकतात.

अजित पवार गटाचं राज्यसभेचं समीकरण आणि सिद्दीकींचं पक्षांतर?

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. अजित पवार गटाकडून अल्पसंख्यांक समाजातील नेत्याला संधी दिली जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यापार्श्वभूमीवर बाबा सिद्दिकी आणि झीशान सिद्दिकी यांच्या अजित पवार गटाच्या प्रवेशाच्या चर्चा समोर आल्यानंतर त्याच्याशी देखील संबंध जोडला जात आहे.

झीशान सिद्दिकींना राजीनामा द्यावा लागणार?

झीशान सिद्दिकी हे मुंबई प्रदेश युवक काँग्रेसमध्ये युवक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. झीशान सिद्दिकी हे काँग्रेसकडून वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. आता त्यांना अजित पवार गटात प्रवेश करायचा असल्यास आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. Read Latest AndSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *