[ad_1]

मुंबई: रमेश सिप्पी यांच्या ‘शोले’ने सिनेइंडस्ट्रीत कमाल केली होती. या सिनेमाला आता ५० वर्षे पूर्ण होतील. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, संजीव कुमार, हेमा मालिनी, जया बच्चन यांच्यासह खलनायक गब्बरसिंग अमजद खान यांसारख्या व्यक्तिरेखांनी लोकप्रियतेचे विक्रम मोडले. ‘शोले’ची भुरळ अनेकांना पडली. पुढं ‘रामगढ के शोले’पासून अगदी ‘रामगोपाल वर्मा की आग’पर्यंत अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं ‘शोले’ आपापल्या सिनेमांतून जागवला. पण शोले सिनेमाची सर कोणत्याही सिनेमाला आली नाही. या सिनेमाचे अनेक किस्से आजही चर्चेत असतात. तर चित्रपटाबद्दलच्या हटके गोष्टी आता कलाकर शेअर करताना दिसतात.
‘गदर २’ मुळे परत आली थिएटरची शान, सकाळचे शो पण झाले हाउसफुल, या २ सीनचं होतंय खूप कौतुक
शोले या सिनेमात हेमा मालिनी बसंतीच्या भूमिकेत होत्या. तर संजीव कुमार यांनी ठाकुरची भूमिका साकारली होती. या सिनेमात दोघांच्याही मुख्यभूमिका असताना, दोघांचाच एकत्र असा एकही सीन नाहीये. याच्या मागंही एक किस्सा आहे. अनेक जण यात विशेष असं काही नाही , असं म्हणतात. पण यामागचं कारण सांगितल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

७० दशकांत संजीव कुमार हेमा मालिनी यांच्या प्रेमात होते. हेमा मालिनी यांना लग्नाची मागणी घालण्यासाठी ते त्यांच्या घरीही गेले होते. पण हेमा मालिनी यांच्या आईनं या नात्याला साफ नकार दिला. त्यामुळं संजीव कुमार आणि हेमा मालिनी यांच्या मैत्रीतही फूट पडली होती.
सलमानवर संतापला प्रवीण तरडे, ‘अंतिम’ सिनेमावर काढला सगळा राग; मराठी अभिनेत्याचीही मिळाली साथ
दोघांच्या या बिघडलेल्या नात्याची गोष्ट इथंच संपली नाही. याच दरम्यान, शोले सिनेमाचं शूटिंग सुरू होतं. सिनेमाच्या आधीच धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लव्हस्टोरी सुरू झाली होती. पण हे संजीव कुमार यांना माहिती नव्हतं. त्यामुळं संजीव कुमार यांनी पुन्हा एकदा हेमा मालिनी यांना प्रपोज केलं. पण हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या नात्याबद्दल माहीत झाल्यानंतर त्यांच्या हाती निराशाच आली.

ट्रॅफिक टाळली, रिक्षा-मेट्रोतून खासदार हेमा मालिनी पोहोचल्या दहिसरला

संजीव कुमार यांनी हेमा मालिनी यांना प्रपोज केल्याच समजल्यानंतर धर्मेंद्र थेट रमेश सिप्पी यांच्याजवळ गेले. धर्मेंद्र यांनी रमेश सिप्पी यांनी हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांचे एकत्र सीन ठेवू नका , असं बजावलं होतं. तेव्हा धर्मेंद्र हे सुपरस्टार होते. सिनेमातले मुख्य हिरो होते. त्यामुळं रमेश सिप्पींना त्यांचा शब्द पाडता आला नाही. त्यामुळं या सिनेमात संजीव कुमार आणि हेमा मालिनी या दोघांचा असा एकही सीन नाहीये.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *