[ad_1]

मुंबई- प्रत्येक मराठी रसिकाच्या आयुष्यात हास्याचे क्षण पेरण्याचे काम ज्या कार्यक्रमाने केले तो कार्यक्रम म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’! ‘महाराष्ट्राच्या टेंशनवरची मात्रा म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, असे म्हणत या विनोदी कार्यक्रमाने समस्त मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केले. विशेष म्हणजे सोनी मराठी वाहिनी आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या दोघांची सुरुवात एकाच दिवशी झाली. सोनी मराठीवरील या तुफान लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाने महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात आपला मोठा प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे.

करोना काळात तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासह जगभरातील मराठी प्रेक्षकांच्या टेंशन वरची मात्रा ठरली. महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला जोडणारा अन् कुटुंबासोबत बसून पाहण्याचा फॅमिली शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. पोट धरून आणि पोट भरून हसवण्यासाठी तुमचे लाडके विनोदवीर ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत’ तुमचं सहकुटुंब स्वागत करायला तयार आहेत!


‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाला तब्बल पाच वर्षं पूर्ण झाली आहेत. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला हास्यजत्रेच्या विनोदावीरांचा चमू सज्ज झाला आहे. अन् तोदेखील कॉमेडीचा फॅमिली पॅक घेऊन. दिवसभरातील संपूर्ण टेंशन विसरून रात्री प्रत्येक कुटुंबाला एकत्र बसून आनंदाचे क्षण मिळवून देण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. १४ ऑगस्टपासून, सोमवार ते गुरुवार रात्री ९ वाजता हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर सहकुटुंब पाहता येणार आहे.

‘वेड’च्या टेलिव्हिजन प्रिमिअरपूर्वी अनोखा विक्रम, गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *