[ad_1]

मुंबई– श्रावण महिना सुरू झाला की सगळ्यांना वेध लागतात ते आपल्या लाडक्या देवाच्या आगमनाचे. गणपती बाप्पाच्या येण्याची सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात. सप्टेंबर महिन्यात सगळ्यांचा लाडका बाप्पा घराघरात विराजमान होणार आहे. सर्वसामान्यांप्रमाणे अनेक मराठी कलाकारांच्या घरी देखील बाप्पाचं आगमन होतं. त्यात लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे हिचा देखील समावेश आहे. मात्र दरवर्षी बाप्पाचं स्वागत हे ढोलताशाच्या गजरात केलं जातं. पुणे आणि मुंबईत अनेक ठिकाणी ढोलताशाच्या गजरात बाप्पाला विराजमान केलं जातं. आता श्रुती याच ढोलताशाच्या पथकात घाम गाळताना दिसतेय. श्रुतीने नुकताच तिचा ढोल वादनाची प्रॅक्टिस करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

नीना गुप्तांचा बोल्ड अंदाज

पुण्यातील एनएमव्ही हायस्कुल येथे खास कलाकारांसाठी असलेल्या ‘कलावंत’ या ढोलताशा पथकाची प्रॅक्टिस केली जाते. आता या वर्षीच्या बाप्पाच्या आगमनाला हे पथक सज्ज होतंय. कलावंत पथकाच्या सरावाचा एक व्हिडिओ अभिनेत्रीने शेअर केला आहे. त्यात ती स्वतः कमरेला ढोल बांधून सराव करताना दिसतेय. या पथकात अनेक कलाकार ढोल वाजवण्यासाठी येतात. त्यात सौरभ गोखले, तेजस्विनी पंडित यांचाही समावेश आहे. श्रुतीने त्यांच्या पथकाच्या सरावाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती जोरदार सराव करताना दिसतेय. खूप आनंदाने आणि ताकदीने ती सराव करताना दिसतेय. तिथे उपस्थित सगळेच प्रचंड उत्साही आहेत.


हा व्हिडिओ पाहून चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत. आपला बाप्पा येणार आणि त्याची तयारी देखील सुरू झालीये हे पाहूनच अनेकांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. त्यात ढोलताशाचा आवाज अनेकांना त्याच्या तालावर डुलायला भाग पाडतोय. श्रुतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आईपेक्षा बाबावरच भारी प्रेम… धनश्री काडगावकरने शेअर केला लेकासोबतचा गोड व्हिडिओ; नेटकरी म्हणतात…[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *