[ad_1]

मुंबई: ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करण्यात यशस्वी ठरला आहे. ३० जून रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा अजूनही थिएटर गाजवत आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा रितेश देशमुखच्या ‘वेड’ सिनेमाचा रेकॉर्ड मोडत सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी सिनेमा ठरला आहे. सर्वाधिक कमाईचा रेकॉर्ड आजही सैराटच्या नावावर आहे. अजूनही बॉक्स ऑफिसवर कमाईची संधी असल्याने सिनेमाच्या टीमने एक खास ऑफर देऊ केली आहे. केदार यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही खास ऑफर समस्त पुरुष वर्गाला उद्देशून असल्याचे म्हटले आहे.

येत्या शुक्रवारपासून अर्थात ११ ऑगस्टपासून हा सिनेमा अवघ्या १०० रुपयांत पाहता येणार आहे. केदार यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘तिने पाहिलाच आहे सिनेमा, आता प्रतीक्षा त्याची आहे. जो तिला नक्की घेऊन जाईल थिएटरमध्ये’. हा फोटो शेअर करताना केदार यांनी असे कॅप्शन दिले आहे की, ‘हा सिनेमा ‘तीने’ डोक्यावर घेतला. पण खरंतर मी तो पुरूषांसाठी सादर केला होता. कारण जोवर तो तीचं मन समजून घेत नाही तोवर काहीच वेगळं घडणार नाही! आता मात्र तीचा मान सन्मान राखा. या शुक्रवार पासून ही बंपर ॲाफर समस्त पुरूष वर्गाला! चांगला सिनेमा तुमची थिएटर मध्ये वाट पाहतोय.’

स्टुडिओ वाचवण्याचा त्या दिवसाचा नितीन देसाईंचा शेवटचा प्रयत्न अन् न सहन होणारा ताण, सहकाऱ्याचा गंभीर आरोप
केदार यांची ही लेटेस्ट इन्स्टाग्राम पोस्ट विशेष चर्चेत आली आहे. चाहत्यांनी यावर कमेंट करत सिनेमा उत्तम जमल्याचं म्हटलं आहे. शिवाय काहींनी कमेंट केल्या आहेत की आता पुन्हा एकदा हा सिनेमा पाहणार. तर अनेकांनी अपेक्षा व्यक्त केली की लवकरच हा सिनेमा १०० कोटींचा टप्पा गाठेल. सिनेमाने ४० दिवसात ७५ कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे ‘आता थांबायचं नाही’ म्हणत चाहत्यांनी सिनेमाच्या टीमला प्रोत्साहन दिले आहे.


अर्जुन-सायलीसमोर प्रिया बरळून गेली तिचा खरा प्लॅन, मधुभाऊंच्या केसला मिळणार नवं वळण?
‘बाईपण भारी देवा’ या सिनेमात सहा बहिणींची कहाणी दाखवण्यात आली आहे. ज्या आपापल्या संसारात रमलेल्या असतात, पण वेगवेगळ्या परिस्थितीशी झगडत असतात. एकमेकींमध्येही काही हेवेदावे असतात. ‘मंगळागौरी’ची एक स्पर्धा त्यांना एकमेकींच्या जवळ आणते आणि त्यांच्या बाईपणाचा प्रवास उलगडत जातो. केदार यांच्या या सिनमात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा परब अशी तगडी स्टारकास्ट आहे. प्रेक्षकांनी या सिनेमाला अक्षरश: डोक्यावर उचलून धरलं आहे.

बाईपण भारी देवा’ चित्रपटाला तोबा गर्दी, गर्दी पाहून व्यवस्थापकांची तारांबळ[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *