[ad_1]

​कोण आहे स्पृहाची बहीण?

​कोण आहे स्पृहाची बहीण?

स्पृहाची बहीण क्षिप्रा जोशी हिनं जिम्नॅस्टिक्समध्ये करिअर केलं आहे. या क्षेत्रात तिनं स्वत:ची अशी ओळख निर्माण केली आहे. धाकट्या बहिणीनं या क्षेत्रात यशस्वी असं करिअर केलं आहे, त्याचा अभिमान वाटतो असं स्पृहा सांगते.२०१० साली दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ गेममध्ये (राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा) ती भारताच्या ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्स टीमची कॅप्टन होती, असं स्पृहानं सांगितलं.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि पुरस्कार

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि पुरस्कार

इतकंच नाही तर क्षिप्रानं आतापर्यंत २० हून अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. तसंच तिच्या नावावर राष्ट्रीय पातळीवरच्या चॅम्पियनशिपचा रेकॉर्ड्स आहेत. इतंच नाही तर तिचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे. फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये क्षिप्रा जोशी हे नाव लोकप्रिय असल्याचं ती सांगते. कारण ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये सर्वात तरुण परीक्षक होण्याचा मान तिनं मिळवला आहे. ती आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांचं परीक्षण करायला जाते. तसंच तिनं प्रशिक्षण दिलेल्या खेळाडू आता आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत असल्याचंही स्पृहानं सांगितलं.तसंच क्षिप्राला तिच्या क्रीडा क्षेत्रातल्या कामगिरीसाठी ‘शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला आहे.

भन्नाट किस्सा

भन्नाट किस्सा

स्पृहा जसं तिच्या बहिणीबद्दल भरभरून बोलते, तसंच क्षिप्रा देखील तिच्या या थोरल्या बहिणीबद्दल बोलताना थकत नाही. काही वर्षांपूर्वी तिनं एसाच एक मजेशीर किस्सा शेअर केला होता. एकदा रस्त्यानं चालत असताना क्षिप्राला एका काकुंनी थांबवलं. त्या काकू म्हणाल्या ‘अगं तूच ना रमा… काय सुंदर काम करतेस गं. आम्ही रोज बघतो तुझी मालिका.’ असं बोलल्यावर तिला कळलं की त्या काकू तिला स्पृहा जोशी समजत होत्या. हा भन्नाट क्षिप्रानं काही वर्षांपूर्वी शेअर केला होता. ‘मी आणि ताई ब्रयापैकी सारख्या दिसत असल्यामुळं लोक मला स्पृहा समजतात. त्या काकूंनी मला रस्त्यात गाठल्यावर मी स्पृहा नाही; तिची बहीण क्षिप्रा आहे असं सांगितलं. तरी ती मलाच खोटं ठरवत होत्या. जवळपास दहा-पंधरा मिनिटं समजूत घातल्यावर कसंबसं त्यांना पटलं’, क्षिप्रानं सांगितलं.

बहिणीचा वाटतो अभिनमान

बहिणीचा वाटतो अभिनमान

फेसबुकच्या स्पृहाच्या फॉलोअर्सची संख्या हा तिच्या लोकप्रियतेचा उत्तम पुरावा. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मधली कुहू, ‘उंच माझा झोका’मधली रमाबाई आणि ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’मधली ईशा या तिन्ही व्यक्तिरेखांमुळं स्पृहा घराघरात पोहोचली. क्षिप्रानं असाही किस्सा सांगितला की, स्पृहाचा तिचा चाहता वर्ग इतका मोठा आहे की फेसबुकचं तिचं अकाउंट गच्च भरायचं. फ्रेंड रिक्वेस्ट फुल असायच्या. तिच्यासाठी, तिच्याशी बोलता यावं म्हणून लोक मला रिक्वेस्ट पाठवायचे. तसंच माझा मेसेज बॉक्स आजकाल तिच्यासाठी भरतो.’ वेगवेगळ्या भूमिका केल्यामुळंच स्पृहा प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे. त्यांच्या मनातला तिच्याविषयीचा आदर बघून अभिमान वाटत असल्याचंही क्षिप्रा सांगते.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *