[ad_1]

मुंबई– बाईपण भारी देवा या चित्रपटाने मराठी सिनेइंडस्ट्रीत नवा इतिहास रचला. बॉक्स ऑफिसवर मराठीच्या सर्व सिनेमांचे रेकॉर्डस् या चित्रपटाने मोडित काढले. त्यामुळे सगळीकडून या चित्रपटाचे भरपूर कौतुक झाले. सहा बहिणींची भूमिका साकारणाऱ्या सहाही अभिनेत्रींवर अजूनही कौतुकांचा वर्षाव होत आहे.

नाही तर मी वेडी झाले असते- सुकन्या कुलकर्णी- मोने

त्यातच एक होत्या त्या म्हणजे अभिनेत्री सुकन्या मोने. त्यांचे बाईपण भारी सिनेमातील पात्रासाठी विशेष कौतुक झाले. पण त्या त्याव्यतिरिक्तही इतर कामांत खूप सक्रिय असतात. त्यांचे नाटक, मालिकांमधील अभिनय खूप उत्कृष्ठ असतो. तसेच त्या उत्तम नृत्यांगना देखील आहेत. पण यापलिकडे त्यांच्या वैयक्तिक गोष्टींबाबात सांगायचे झाल्यास सुकन्या हे त्यांचे मुळ नाव नाहीच.

व्यवसायाच्या नावाखाली चित्रपट निर्मात्याने घातला कोट्यवधींचा गंडा, पोलिसांनी केली अटक
अभिनेत्री सुकन्या मोने यांनी सुलेखा तळवलकर यांच्या पॉडकास्ट दिल के करीब या शोमध्ये आपल्या खऱ्या नावाबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या की, सुकन्या म्हणाल्या, सुरुवातीला आम्ही चाळीत राहायचो. चाळीतून आम्ही ब्लॉकमध्ये आलो तेव्हा माझा जन्म झाला. तेव्हा वडिलांनी माझं नाव धनश्री ठेवलं. कारण माझा जन्म झाल्यानंतर आम्ही चाळीतून ब्लॉकमध्ये गेलो होतो. त्यामुळे धनाची पेटी या आशयाने त्यांनी माझं नाव धनश्री असं ठेवलं होतं.”

“पण माझ्या आईला हे नाव आवडल नव्हतं. तिच्या मते धनश्री हे खूपच कॉमन नाव आहे. आणि म्हणून तिने माझं नाव सुकन्या ठेवलं. सुकन्या नावाप्रमाणे मी असायला हवी अशी तिची इच्छा होती.”

शाहरुख खानच्या ‘जवान’पुढे ‘गदर २’ने गुडघे टेकले; सनी देओलच्या सिनेमाच्या स्क्रिनमध्येही घट
सुकन्या मोने यांचे बाईपण भारी देवासाठी कौतुक होतच आहे, पण त्यापूर्वीही त्यांनी अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई, घाडेगे एण्ड सून, सुंदर माझे घर या अलिकडील मालिकांमधूनही प्रेक्षकांची मनं जिंकली. याशिवाय त्यांच्या वादळवाट, आभाळमाया, जुळून येती रेशमीगाठी या मालिकासुद्धा तुफान गाजल्या.

सुकन्या मोने आता इंद्रधनुष्य या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लंडनमध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरु झालं आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *