[ad_1]

मुंबई: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्त्व करण्याची शक्यता आहे. २३ नोव्हेंबरपासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळेल. पहिला सामना विशाखापट्टणमला होईल. या मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाईल. द इंडियन एक्स्प्रेसनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडे भारतीय टी-२० संघाची धुरा दिली जाणार होती. पण विश्वचषक स्पर्धेत बांग्लादेशविरुद्ध त्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला संपूर्ण स्पर्धेला मुकावं लागलं. पांड्या दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे त्याच्या जागी नेतृत्त्वाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात येईल. याआधी यादवनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे.मुंबई आणि भारताच्या २३ वर्षांखालील संघाचं नेतृत्त्व करण्याचा अनुभव सूर्यकुमार यादवच्या गाठिशी आहे. त्याचा उपयोग त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत होईल. या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि अन्य वरिष्ठ खेळाडू खेळण्याची शक्यता अतिशय कमी आहे. वर्ल्डकपसाठी निवड झालेल्या इशान किशन आणि प्रसिद्ध कृष्णा यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संधी दिली जाईल. यासोबतच यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह, तिलक वर्मा, अर्शदीप सिंग यांनाही संघात स्थान दिलं जाऊ शकतं. भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ वर्ल्डकप नंतर संपणार आहे. द्रविड यांना मुदतवाढ मिळणार का, दिल्यास ती मुदतवाढ द्रविड स्वीकारणार का, हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी द्रविड उपलब्ध नसल्यास त्यांची जागा व्ही. व्ही. एस. लक्ष्मण घेऊ शकतात. ते सध्या एनसीएचे प्रमुख म्हणून काम करत आहेत.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *