राजकोट: टीम इंडिया लवकरच राजकोट कसोटी सामन्याची तयारी सुरू करणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मालिकेतील दुसरा सामना जिंकला होता. भारताने पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यासाठी यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतला प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम ठेवले होते. मात्र बॅटने तो विशेष काही करू शकला नाही. आता तो तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडू शकतो, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. भारताचा माजी क्रिकेटपटूने यावर प्रतिक्रिया दिली आहे. केएस भरत याच्यावर हा अन्याय असेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

केएस भरतने इंग्लंडविरुद्धच्या हैदराबाद कसोटीच्या पहिल्या डावात ४१ धावा केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या डावात २८ धावा त्याने केल्या. या सामन्यात त्याने दोन झेलही टिपले. यानंतर विशाखापट्टणममध्ये पहिल्या डावात १७ आणि दुसऱ्या डावात ६ धावा केल्या. या सामन्यातही भरतने २ झेल घेतले होते. मात्र बॅटने तो विशेष काही करू शकला नाही. तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधून भरतला वगळले जाऊ शकते. मात्र, माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याबाबत नाराज आहे.

केएस भरतबद्दल आकाश चोप्रा काय म्हणाले?

इंडिया टुडेच्या बातमीनुसार, आकाश चोप्रा म्हणाले, “ध्रुव जुरेल पदार्पण करणार असल्याच्या बातम्या मी ऐकत आहे. हे चूक की बरोबर असा प्रश्न पडतो. तुम्ही मला विचाराल तर, केएस भरतला त्याच्ये यष्टिरक्षण पाहता याचा निर्णय घेतला पाहिजे. मी जेवढं पाहिलं त्यात मला काहीच वाईट किंवा चुका करताना दिसलं नाही. त्याने चांगली कामगिरी केली आहे.”

ध्रुव जुरेलला पदार्पणाची संधी मिळणार?

उत्तर प्रदेशचा क्रिकेटपटू ध्रुव जुरेलचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ७९० धावा केल्या आहेत. ध्रुवने या फॉरमॅटमध्ये द्विशतक झळकावले आहे. त्याने एक शतक आणि ५ अर्धशतकेही केली आहेत. ध्रुवची सर्वोत्तम धावसंख्या २४९ धावा आहे. तो लिस्ट ए आणि टी-२० फॉरमॅटमध्येही खेळला आहे. टीम इंडिया ध्रुवला तिसऱ्या कसोटी सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देऊ शकते. पण खरं पाहता ध्रुव जुरेलपेक्षा केएल भरतला विकेटकिपिंगचा जास्त अनुभव आहे, त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन खूप विचार करून हा निर्णय घेईल. त्यामुळे जर टीम इंडियाने संघ निवडताना केएस भारतला वगळले तर ते भारतासाठी ते धोकदायक ठरू शकते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *