[ad_1]

मुंबई : शिंदे गटातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबाराचं प्रकरण ताजं असतानाच ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती आहे. मुंबईतील दहिसर येथे अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालेला असून त्यांना तीन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती कळतीये. दहिसर येथील करुणा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत असून मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस घटनास्थळी पोहोचत आहेत. पैशाच्या वादातून ही घटना घडल्याचं बोललं जात आहे.

अक्षय आढाव यांच्याविषयी

अक्षय आढाव
अक्षय आढाव

अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव | राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.… Read More

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *