[ad_1]

नवी दिल्ली: जाहीर झाला असून यात भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. करप्शन परसेप्शन इंडेक्सनुसार भारताचे स्थान घसरले आहे. २०२२मध्ये भारताचे सीपीआय ४० होता तो आता ३९ झाला आहे. जगातील १८० देशांपैकी डेनमार्कमध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार असून त्यांना सर्वाधिक ९० गुण मिळाले आहेत. तर भारताचा शेजारी असलेल्या आणि दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानसाठी या इंडेक्समधून दिसाला मिळाला आहे. शहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांच्या राज्यात पाकिस्तानमधील भ्रष्टाचार कमी झाल्याचे म्हटले आहे. २०२२ साली पाकिस्तान १४०व्या क्रमांकावर होता आता तो १३३व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा सीपीआय २९ इतका होता तो आता २७ इतका झाला आहे. डेन्मार्क, फिनलँड आणि न्यूझीलंड यांना ९० सीपीआय मिळाले आहेत. या देशात सर्वात कमी भ्रष्टाचार असल्याचे म्हटले आहे. तर सोमालिया (सीपीआय ११), व्हेनेझुएला (१३), सीरिया (१३), दक्षिण सुदान (१३) आणि यमन (१६) या देशात सर्वाधिक भ्रष्टाचार असल्याचे म्हटले आहे. सर्वाधिक भ्रष्ट देशांमध्ये सोमालिया अव्वल स्थानी आहे. वरील सर्व देशात सर्वात जास्त भ्रष्टाचार होतो. या शिवाययातील काही देशात शसस्त्र संघर्ष देखील सुरू आहे. जगभरातील देशांची सरासरी सीपीआय सलग १२व्या वर्षी ४३ इतकी राहिली आहे. दोन तृतीयांश देशांना ५० पेक्षा कमी गुण मिळाले. त्याच बरोबर जगभरात न्याय व्यवस्थेत्या कार्यपद्धतीत घसरण झाल्याचे म्हटले आहे. ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलचे अध्यक्ष फ्रॅकोइस यांनी म्हटले की, जोपर्यंत न्याय व्यवस्थेतील त्रुटी दूर केल्या जात नाहीत तोपर्यंत भ्रष्टाचार कमी होणार नाही.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *