[ad_1]

मुंबई: ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला मिळालेल्या बम्पर यशामुळं महाराष्ट्रातील सिनेमागृहांमध्ये आनंदी वातावरण पाहायला मिळतंय. अनेक महिलांनी दोन-तीनदा नव्हे, तर अगदी पाच-सहा वेळा सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात हजेरी लावली आहे. पुरुष मंडळीही यात मागे नाहीत. आता मुंबई पोलिसांनीही हा सिनेमा पाहिलाय.
‘धकाधकीच्या जीवनात थोडा विरंगुळा हवाच’ हा या सिनेमातल्या डायलॉगचा प्रभाव म्हणा, काल संध्याकाळी मुंबई पोलीस झोन ५ ( माहीम) चे डीसीपी मनोज पाटील यांनी आपल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः ‘पुरुष’ कर्मचाऱ्यांसाठी बाईपण भारी देवाचा स्पेशल शो आयोजित केला होता. यावेळी चित्रपटातील कलाकार वंदना गुप्ते आणि सुकन्या कुलकर्णी मोने, दिग्दर्शक केदार शिंदे, सहनिर्माते अजित भुरे आणि जिओ स्टुडिओज मराठीचे कन्टेंट हेड निखिल साने उपस्थीत होते.
अंकिता लोखंडेनं केलं दुसऱ्यांदा लग्न, Video सोशल मीडियावर व्हायरल

चित्रपटाच्या टीम चे अभिनंदन करत डीसीपी मनोज पाटील म्हणाले की, ‘आमचे एसीपी कुरंदकर यांनी पुरुषांना ही फिल्म दाखवावी अशी छान कल्पना सुचवली. आम्हा पोलिसांना सणवार, सुट्ट्या नसतातच, आम्ही जास्तीत जास्त वेळ बाहेरच असतो आणि अशा वेळेस आपल्या कुटुंबाची खऱ्या अर्थानं काळजी ही आपली पत्नी किंवा घरातील स्त्री घेते. पण हे करताना तिच्या ज्या काही अडचणी असतात त्या आपल्याला माहितीच नसतात, आणि म्हणूनच त्याची जाणीव करून देण्यासाठी हा चित्रपट दाखवण्याचा उद्देश्य होता. मला वाटतं सर्व पुरुष पोलिसांनी हा चित्रपट जरूर पहावा. ज्यामुळं जेव्हा महिला पोलिस स्टेशनला येतील तेव्हा त्यांच्या अडचणी आम्ही अजून चांगल्या पद्धतीनं सोडवू. एवढा उत्कृष्ट चित्रपट महाराष्ट्राला आणि समाजाला दिला त्याबद्दल संपूर्ण टीमचे आभार.
थांबायचं नाय गड्या! १०० कोटी आता दूर नाही, ‘बाईपण भारी देवा’कडून पुरुषांना खास ऑफर
अभिनेत्री वंदना गुप्ते म्हणाल्या की, ‘तुम्हा सगळ्या मुंबई पोलिसांचा मला फार अभिमान आहे, कमाल आहे तुमची. कारण तुम्ही सगळे आहात म्हणून आज आम्ही सुरक्षित आहोत, मु्ंबई सुरक्षित आहे आणि महिला सुरक्षित आहे.

दरम्यान, सर्वांच्या लाडक्या मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनंदेखील सपत्नीक हा चित्रपट पाहिला आणि त्याचं भरभरून कौतुक केलं. ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याचे उद्गार होते, ‘एकदम भारी…आता आईलाही हा चित्रपट दाखवणार.’

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *