[ad_1]

मुंबई : पवित्र रिश्ता या मालिकेमुळं अभिनेत्री अंकिता लोखंडे घराघरात पोहोचली. पहिल्याच मालिकेनं तिला प्रचंड लोकप्रिया मिळवून दिली.. पवित्र रिश्ता मालिकेत अंकितानं अर्चना ही भूमिका साकारली होती. त्यानंतर अंकितानं बॉलिवूडमधील काही सिनेमातही काम केलं आहे. खरं तर अभिनयाबरोबरच अंकिता सोशल मीडियावर देखील खूपच सक्रिय असते. ती विविध कारणांमुळं चर्चेत असते. आता अंकिता तिच्या दुसऱ्या लग्नामुळं चर्चेत आहे.

सुभेदार चित्रपटात पहिल्यांदाच कुलकर्णी कुटुंब दिसणार एका पडद्यावर, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
२०२१मध्ये अंकितानं बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली. मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये तिचा हा शाही विवाहसोहळा पार पडला होता. तिच्या या लग्नाची चर्चाही प्रचंड झाली होती. अनेक सेलिब्रिटींनी तिच्या लग्नाला हजेरी लावली होती. आता पुन्हा एकदा अंकिताच्या लग्नाची चर्चा होतेय. अंकितानं विकी जैनसोबत पुन्हा एकदा लग्न केलंय. अंकितानं स्वत: व्हिडिओ शेअर करत त्यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल सांगितलं आहे. अंकिता आणि विकी यांनी परदेशात ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं. ‘आम्ही पुन्हा लग्न केलं’ असं कॅप्शन अंकितानं या व्हिडिओला दिलं आहे.

लुकची चर्चा
या ख्रिश्चन पद्धतीच्या लग्नात अंकितानं खरं पर पांढऱ्या रंगाचा वेडिंग गाऊन न घालता फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. नेहमीप्रमाणं ती सुंदर दिसत आहे. तिनं लग्नाचा व्हिडिओ तर शेअर केलाच आहे, पण विकीसोबतचे अनेक फोटोही शेअर केले आहेत.

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
अंकिताच्या चाहत्यांनी या दुसऱ्या लग्नाच्या फोटो, व्हिडिओंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला असला तरी, अनेक नेटकऱ्यांनी अंकिताला आणि विकीला ट्रोल केलं आहे.
हरी नरकेंची लेक प्रख्यात मराठी अभिनेत्री; तुकारामांची ‘अवली’ साकारली, रसिकांच्या मनावर ‘हेमा’ही ठसवली

अंकिताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती कंगनाच्या ‘मणिकर्णिका’ २०१९ सिनेमात ‘झलकारी बाई’ची भूमिका साकारली होती. तिची भूमिकाही प्रेक्षकांना खूप आवडली होती. पण, त्यानंतर मात्र तिला सिनेमात काम मिळालं नसल्याची खंत अंकितानं एका मुलाखतीमध्ये व्यक्त केली होती. अंकितानं मुलाखतीमध्ये पुढं सांगितलं होतं की, ‘इथं माझा कुणीही गॉडफादर नाही. त्यामुळं काम मिळवण्यासाठी कष्ट घ्यायला तयार आहे. परंतु माझ्याकडे कामच येत नाही.’

अंकिता लोखंडे – विकी जैनचा रोमॅन्टीक अंदाज[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *