मुंबई : अंतरिम अर्थसंकल्प २०२४ मधील तरतूदींनुसार पवन ऊर्जेला चालना मिळण्याची चर्चा असून त्याचा जोरदार परिणाम शुक्रवारी (२ फेब्रुवारी) पवन ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सवर दिसून आला. सुझलॉन एनर्जीचा शेअर ५ टक्क्यांच्या वरच्या सर्किटला लागला. शेअरने बीएसईवर ५०.७२ रुपयांचा नवीन उच्चांक गाठला असून सुझलॉन एनर्जी शेअरची ही १२ वर्षांची सर्वोच्च पातळी आहे. यापूर्वी ५ ऑगस्ट २०११ रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा शेअर बीएसईवर ५०.२५ रुपयांच्या पातळीवर स्थिरावला होता. सुझलॉनची वर्षभरात ४५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली असली तरी, तज्ज्ञ शेअरवर उत्साही आहेत. तर शेअर अल्पावधीत सुमारे २०% वाढ दर्शवू शकतो.

आरबीआयचे निर्बंध,शेअर्समध्ये सातत्यानं घसरण; पेटीएमसाठी मोठी अपडेट, बड्या कंपनीकडून २४४ कोटींची गुंतवणूक
अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा
अंतरिम अर्थसंकल्प २०२४ नुसार, एक गिगा वॅट ऑफशोअर पवन ऊर्जा क्षमतेच्या विकासासाठी व्यवहार्यता अंतर निधी उपलब्ध करून देण्याची सरकारची योजना आहे. सुझलॉन एनर्जी ही देशातील सर्वात मोठी पवन ऊर्जा क्षेत्रातील कंपनी आहे. त्याची बाजार भांडवल ३३% हून अधिक आहे. शुक्रवारी (२ फेब्रुवारी) सुझलॉनचे शेअर्स बीएसईवर ४९.९० रुपयांवर खुला झाला असून काही वेळाने शेअरमध्ये कमालीची वाढ झाली आणि शेअरने वरच्या सर्किटला स्पर्श केला. तेजीने इंट्राडेमध्ये ५०.७२ रुपयांचा नवा ५२ आठवड्यांचा उच्चांक नोंदवला. एकत्रितपणे १२ वर्षांत सुझलॉनच्या स्टॉकने नवीन शिखरावर मुसंडी मारली असून यापूर्वी, तेल्या दोन ट्रेडिंग सत्रात देखील शेअरने अप्पर सर्किटला धडक दिली होती.

अर्थसंकल्प पावला! अर्थसंकल्पानंतर या कंपन्यांचे शेअर तेजीत, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची पळापळ
सुझलॉन एनर्जीचे नवीन लक्ष्य
चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बगाडिया म्हणतात, सुझलॉनच्या शेअरची किंमत चार्ट पॅटर्नवर सकारात्मक दिसते. ज्या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये हा शेअर आहे. त्यांना तो कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच यामध्ये ४५ रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा लागेल. सुझलॉनचे शेअर्स अल्पावधीत ५५ ते ६० रुपयांची पातळी गाठू शकतात. विशेष म्हणजे, गेल्या एका वर्षात सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या शेअरमध्ये लक्षणीय तेजी पाहायला मिळाली आहे.

TATA ग्रुपची कंपनी कर्जमुक्त होतेय, शेअर्स पुढे मालामाल करण्याचे संकेत; आली फायद्याची अपडेट
गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये मोठा परतावा मिळाला आहे. या कालावधीत भागधारकांना ४५० टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला. या कालावधीत शेअर ९.२० ते ५०.७२ रुपयांपर्यंत वधारला आह. सहा महिन्यांत परतावा सुमारे १७०% असून बीएसईवरील शेअरचे बाजार भांडवल ६८,२२९ कोटी रुपये झाले.

Read Latest Business NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *