[ad_1]

मोड आलेली मेथी

मोड आलेली मेथी

कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्या रुग्णांसाठी मोड आलेली मेथी खूप फायदेशीर ठरते. मेथीच्या स्प्राउट्समध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. तसेच यामध्ये फायबरचे प्रमाणही चांगले असते, ज्यामुळे तुमचे वजन बर्‍याच प्रमाणात नियंत्रित ठेवता येते.

​​​​(वाचा – ३५ वर्षांच्या कार्डियोलॉजिस्ट डॉक्टरने चक्क चॉकलेट खाऊन कमी केलं १४ किलो वजन, या २ पदार्थांचा समावेश महत्वाचा)

​मोड आलेली नाचणी

​मोड आलेली नाचणी

मोड आलेली नाचणी कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी आरोग्यदायी असू शकते. यामध्ये लेसिथिन आणि मेथिओनिन या एमिनो अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असतात, जे आपल्या यकृतामध्ये साठलेली अतिरिक्त चरबी काढून टाकण्याचे काम करतात.

एवढेच नाही तर मोड आलेली नाचणीमध्ये अमिनो अ‍ॅसिड थ्रेओनाइन देखील भरपूर असते, ज्यामुळे यकृतातील चरबी कमी होऊ शकते. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते.

(वाचा – Best Cough Syrup : WHO ने भारतातल्या या कफाच्या औषधाला म्हटलंय ‘विष’, खोकल्यावर रामबाण ठरतील ६ आयुर्वेदिक उपाय)

​मोड आलेली बाजरी

​मोड आलेली बाजरी

कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात मोड आलेली बाजरीचा समावेश करावा. त्यात हृदयविकाराचा धोका कमी करण्याचा गुणधर्म आहे. मोड आलेल्या बाजरीमध्ये भरपूर फायबर असते.

जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यास मदत करते. हे तुम्हाला हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. शरीरातील वाढणारे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी या स्प्राउट्सचे सेवन केले जाऊ शकते. मात्र, जर तुमची समस्या खूप वाढत असेल तर अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *