[ad_1]

मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसेचे दिग्गज नेते अशोक चव्हाण आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील. त्यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा काल राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मराठवाड्यात चव्हाण यांची ताकद आहे. त्या जोरावर भाजपला लोकसभा निवडणुकीत काँटे की टक्कर दिली जाऊ शकत होती. पण चव्हाण यांनी पक्षाला रामराम केल्यानं पक्षाला लोकसभा निवडणुकीत फटका बसू शकतो.

अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत होईल अशी शक्यता होती. पण चव्हाणांचा पक्षप्रवेश अतिशय घाईघाईत होत असल्याचं चित्र आहे. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी भाजपचा राष्ट्रीय पातळीवरील मोठा नेता उपस्थित नसेल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पक्षप्रवेशावेळी उपस्थित असतील. चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेवर पाठवलं जाण्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यासाठीची तारीख जवळ आली आहे. त्यामुळेच चव्हाणांचा पक्षप्रवेश घाईत उरकला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
ना सभा, ना शक्तिप्रदर्शन; सगळ्या मनसुब्यांवर पाणी; चव्हाणांना भाजप प्रवेशाची इतकी घाई का?
उपमुख्यमंत्री व्हायची इच्छा होती, पण…
सध्या राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद आहे. अशोक चव्हाणदेखील उपमुख्यमंत्री होण्यास उत्सुक होते. महसूल, सार्वजनिक बांधकाम विभागासह उपमुख्यमंत्रिपदाची मागणी त्यांनी केली होती. पण विद्यमान उपमुख्यमंत्री फडणवीसांनी त्यास विरोध केला. चव्हाण उपमुख्यमंत्री झाल्यास राज्यातील आपली राजकीय कारकीर्द संपेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती, असं वृत्त न्यू इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे.

अशोक चव्हाणांना उपमुख्यमंत्रिपद देण्यास देवेंद्र फडणवीसांनी कडाडून विरोध केल्याचं ट्विट वरिष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी केलं आहे. ‘भाजपमधून दोन उपमुख्यमंत्री असल्यास पक्षात दोन सत्ताकेंद्रं तयार होतील. त्याचा फटका मला बसेल. पर्यायी मराठा चेहरा म्हणून अशोक चव्हाण मोठे होऊ शकतात,’ अशी भीती फडणवीसांनी बोलून दाखवल्याचं सूर्यवंशींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अशोक चव्हाण यांना भाजपनं दिलेल्या आश्वासनांचा तपशील सुत्रांच्या हवाल्यानं वृत्तात देण्यात आला आहे. ‘राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर अशोक चव्हाण यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात येईल. त्यांची कन्या येत्या विधानसभेत चव्हाणांच्या पारंपारिक मतदारसंघातून निवडणूक लढवेल. भोकर मतदारसंघातून तिला तिकीट देण्यात येईल. राज्यात भाजपची सत्ता आल्यावर तिला मंत्रिपद दिलं जाईल,’ असं न्यू इंडियन एक्स्प्रेसनं वृत्तात म्हटलं आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *