[ad_1]

कोलकाता: वनडे वर्ल्डकप २०२३ मध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील लढत कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर सुरू आहे. या लढतीत इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने टॉस जिंकला आणि तेथेच पाकिस्तान सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर झाले. स्पर्धेत नेदरलँड्स आणि बांगलादेश वगळता सर्व संघांकडून पराभूत होणाऱ्या इंग्लंडने या सामन्यात ५० षटकात ९ बाद ३३७ धावा केल्या. आता पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी विजयाचे लक्ष्य ६.४ षटकात पार करावे लागेल, जे अशक्य आहे.

पाकिस्तानचा जलद गोलंदाज हारिस रौफच्या नावावर असा एक विक्रम केला जो वर्ल्डकप क्रिकेटच्या इतिहासात कोणी केला नाही. रौफने या सामन्यात १० षटकात ३ विकेट घेत ६४ धावा दिल्या. वर्ल्डकप २०२३च्या ९ सामन्यात रौफने ५३३ धावा दिल्या. वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील तो सर्वात महाग गोलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम इंग्लंडच्या आदिल रशीदच्या नावावर होता. त्याने २०१९च्या स्पर्धेत ५२६ धावा दिल्या होत्या. या यादीत श्रीलंकाचा दिलशान मधुशंका तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने या स्पर्धेत ५२५ धावा दिल्या आहेत.

वर्ल्डकपमधून पाकिस्तानचा गाशा गुंडाळला; सेमीफायनलचे ४ संघ ठरले, नॉकआउट लढतीचे संपूर्ण वेळापत्रक
एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज

हारिस रौफ- ५३३ धावा, २०२३
आदिल राशिद- ५२६ धावा, २०१९
दिलशान मधुशंका- ५२५ धावा, २०२३
मिचेल स्टार्क- ५०२ धावा, २०१९
मुस्तफिजुर रहमान- ४८४ धावा, २०१९
शाहीन आफ्रिदी- ४८१ धावा, २०२३

नेदरलँड्सविरुद्धच्या लढतीत संपूर्ण जगाचे लक्ष रोहित शर्माकडे; एक-दोन नव्हे तब्बल ८ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची सुवर्ण संधी
हारिसच्या नावावर हा नकोसा विक्रम झाला असला तरी वर्ल्डकप २०२३ मध्ये डेथ ओव्हर्स म्हणजे ४१ ते ५० षटकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात तो अव्वल स्थानावर आहे. त्याने डेथ ओव्हर्समध्ये १० विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर भारताचा जसप्रीत बुमराह असून त्याने ७ विकेट घेतल्या आहेत.

या सामन्यात इंग्लंडने वर्ल्डकपमधील पाकिस्तानविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या देखील केली. याआधी त्यांनी २०१९ साली ९ बाद ३३४ धावा केल्या होत्या. तर कोलकाता मैदानावरील वनडेतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. अव्वल स्थानी टीम इंडिया असून त्यांनी २०१४ साली लंकेविरुद्ध ४०४ धावा केल्या होत्या.

Read Latest Sports News And Marathi News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *