डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : मागील बऱ्याच महिन्यांपासून वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यासंदर्भात प्रयत्न सुरू होते. अखेर त्या प्रयत्नांना यश आले असून अधिकृतरित्या वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग झाली आहे. आंबेडकरांच्या आघाडीतील समावेशामुळे महाविकास आघाडीची राज्यातील ताकद वाढणार आहे. महायुती सोबत दोन हात करताना महाविकास आघाडीला आता वंचित बहुजन आघाडीची भक्कम साथ मिळणार आहे. या नव्या समीकरणामुळे परभणी लोकसभा मतदारसंघातही याचा चांगलाच परिणाम होणार आहे.परभणी लोकसभा मतदारसंघाचा विचार केला असता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना खासदार यांना ५ लाख ३८ हजार मते मिळाली होती. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांना ४ लाख ९६ हजार मते मिळाली होती. या निवडणुकीत खासदार संजय जाधव हे ४२ हजार मतांनी निवडून आले होते. त्यांचा विजय वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे सुकर झाला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांनी १ लाख ४९ हजार मते मिळवली होती. तब्बल दीड लाख दलित मुस्लिम समाजाची मते वंचितच्या उमेदवाराला मिळाल्यानं शिवसेना खासदार संजय जाधव यांचा विजय झाला होता. २०२४ची लोकसभा विद्यमान खासदार संजय जाधव यांच्यासाठी कठीण जाणार हे दिसत आहे. कारण खासदार संजय जाधव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेले नाहीत तर यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत. त्यामुळे त्यांना मागच्या वेळेस सारखे भाजपची भक्कम साथ राहणार नाही. त्यातच राष्ट्रवादीचे देखील दोन तुकडे झाले आहेत. परभणी जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादीची ताकद वाढलेली आहे. त्यातच विद्यमान खासदार संजय जाधव मागील दहा वर्ष परभणी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांच्याविषयी नाराजी देखील मोठ्या प्रमाणावर आहे. असे असली तरी आता वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी सोबत आल्याने याचा चांगलाच फायदा विद्यमान खासदार संजय जाधव यांना होणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ला मिळालेली दीड लाख मते ही आता खासदार संजय जाधव यांच्या पारड्यात पडू शकतात. त्यामुळे महायुतीला २०२४ मध्ये परभणी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक जी सोपी वाटत होती ती आता सोपी राहणार नाही. Read Latest AndSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *