[ad_1]

मुंबई- मेलबर्नमध्ये ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाच्या प्रीमिअरच्या वेळी एक अतिशय रंजक घटना घडली. येथे एका मुलीने बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यनला लग्नाची मागणी घातली. मग काय, कार्तिक आर्यनचे गाल लाजेने अगदी लाल झाले. गुरुवारी कार्तिक इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी मेलबर्नला गेला होता. तिथे त्याच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता.

कार्तिक आर्यनने येथे त्याच्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले. अभिनेता येथे त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत होता. पण या सगळ्यामध्ये एक चाहती होती तिने थेट अभिनेत्याला लग्नाची मागणी घातली. ज्या थिएटरमध्ये हा चित्रपट दाखवला जात होता, तिथे एका चाहतीने कार्तिकला म्हटले की, “मला हा प्रश्न पुन्हा कधीच विचारण्याची संधी मिळणार नाही, त्यामुळे मी आताच विचारते ‘तू माझ्याशी लग्न करशील का?'”

कॅनडियन पॉलाला पडली मराठमोळ्या सारंग साठेची भुरळ….आणि मग जन्मला आलं ‘भाडिपा’ हे बाळ
लग्नाचा प्रस्ताव ऐकून कार्तिक आर्यन लाजला

कार्तिक लाजतच म्हणाला, ‘इथे एक प्रेमकहाणी विचारत आहे, तर एकीने लग्नाची मागणी घातली आहे. हे काय चालले आहे इथे. मला इथे माझा स्वयंवर होतोय असंच वाटतंय. त्यानंतर चाहतीने कार्तिकला मिठी मारण्याची विनंती केली, ज्यावर त्याने, “तुम्ही मारू शकता” असे उत्तर दिले.

‘दोस्ताना २’ मधून कार्तिक आर्यनला काढण्यामागचं कारण काय?

कार्तिक आर्यन मेलबर्नला गेला

IFFM चा भाग होण्याचा आनंद शेअर करताना, कार्तिक आर्यन म्हणाला, “मी मेलबर्नच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलचा एक भाग होण्यासाठी खूप उत्साही आहे. मेलबर्नमध्ये ही माझी पहिलीच वेळ आहे आणि मी येथे ‘सत्यप्रेम की कथा’च्या स्क्रीनिंगसाठी आलो आहे.

मुस्लिम मुलीशी लग्न करायला सुनील शेट्टीने केलेलं जीवाचं रान, वाचा त्याचा सुखी वैवाहिक मंत्र
कार्तिक आणि कियाराचा ‘सत्य प्रेम की कथा’

सत्यप्रेम की कथा हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये अहमदाबादचा एक मध्यमवर्गीय मुलगा सत्यप्रेम हा ‘कथा’ या पात्राच्या प्रेमात पडतो. या चित्रपटात कियारा अडवाणी, सुप्रिया पाठक, गजराज राव आणि शिखा तलसानिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वांस यांनी केले आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *