[ad_1]

मुंबई- महामारीच्या काळानंतर डिजिटल युग जास्त सरसावले आहे. अनेक कलाकार मंडळींनी देखील आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी या माध्यमाचा पुरेपूर वापर करून घेतला. त्या काळात शूटिंग बंद असल्यामुळे घरच्या घरी काहीतरी कॉन्टेन्ट निर्माण करून तो डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे प्रेक्षकांसमोर आणला जात होता. त्यामुळेच अनेक डिजिटल चॅनल देखील आता खूप लोकप्रिय झाली आहेत. याच चॅनल मधील एक म्हणजे भाडिपा. दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या गोष्टी घेऊन या डिजिटल माध्यमावर सिरीज किंवा काही छोटे छोटे व्हिडिओ प्रदर्शित होत असतात. या चॅनल पाठी सर्वात मोठा हातखंडा आहे तो म्हणजे अभिनेता सारंग साठेचा. भाडिपाच्या माध्यमातून सारंग आपले वेगवेगळे विचार, संकल्प लोकांसमोर आणतो. त्याला प्रेक्षकही भरभरून प्रतिसाद देत असतात. आज ११ ऑगस्ट रोजी सारंग आपला ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. आणखीन एका गोष्टीमुळे चर्चेत असतो ती म्हणजे त्याची पत्नी पॉला.
जॅकी श्रॉफने शाहरुखला शिकवलेली ही शिवी, asksrk सेशनमध्ये अभिनेत्याने स्पष्टच सांगितलं
सारंग ची पत्नी ही विदेशी आहे मात्र तरीही ती उत्तम मराठी ही बोलते. आज आपण त्याची लव्ह स्टोरी जाणून घेऊ.

सारंग ने जेव्हा पॉलाला आपली भावी पत्नी म्हणून निवडले तेव्हा अनेकांच्या भुवया उंच झाल्या होत्या. सारंग हा अस्सल पुणेरी तर त्याची पत्नी पॉला ही मुलगी कॅनडाची आहे. तिचे पूर्ण नाव पॉला मॅकग्लेननं असे आहे. तिने आपण होऊन मोठ्या उत्साहाने संपूर्ण भारतीय संस्कृती शिकून घेतला असे सर्वांनाच कौतुक वाटते.

कंटेंट क्रिएटर्सना सांरग साठ्येनं दिला मोलाचा सल्ला

सारंग ने एका मुलाखतीत त्याच्या व पॉलाच्या लव्ह स्टोरी बद्दल सांगितले होते, तो म्हणालेला की, ‘पॉला आणि मी गेल्या आठएक वर्षांपासून एकत्र आहोत. नाटक, सिनेमा करत असतानाच आमची भेट झाली, विचार आवडू लागले आणि आम्हीही एकमेकांना आवडू लागलो. आम्ही ९ वर्षांपूर्वी एकमेकांना भेटलो. पॉलाची भारतात जेव्हा दुसरी ट्रीप होती, तेव्हा तिने माझा एक चित्रपट पाहिला होता. यानंतर टोरँटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये माझा एक चित्रपट होता, याच फेस्टिवल मध्ये पॉलाची शॉर्ट फिल्मही होती. त्यानंतर आम्ही कामानिमित्त भेटू लागलो. एका चित्रपटावर आम्ही एकत्र काम केले. हे करत असताना आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. ‘

मुस्लिम मुलीशी लग्न करायला सुनील शेट्टीने केलेलं जीवाचं रान, वाचा त्याचा सुखी वैवाहिक मंत्र
सारंग पहिल्या भेटीतच पॉलाच्या प्रेमात पडला. भाषेची अडचण बरीच होती. पण ती हळूहळू कमी होत गेली. आम्ही दोघेही एकमेकांना आवडू लागलो. त्यानंतर मी आणि पॉलाने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मग आम्ही पुण्यात राहू लागलो. याआधी मी घरी आई वडिलांना आमच्या नात्याविषयी सांगितले. घरच्यांच्या मान्यतेनंतर गेली आठ वर्षे एकत्र राहत आहोत. विशेष म्हणजे ‘भाडीपा’ हे पॉलाचं बाळ आहे. तिच्याच संकल्पनेतून ते आकाराला आलं आहे हे देखील सारंगने मोठ्या उत्साहात सांगितलं.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *