याबाबत रोहित शर्मा म्हणाला की, ” अश्विन हा काही वर्षात किती वन-डे खेळला ही आकडेवारी महत्त्वाची नाही. तो अनुभवी आहे. कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटशी जुळवून तो घेऊ शकतो. आम्ही त्याच्याबरोबर या संदर्भात दीर्घ चर्चा केली आहे. त्याची निवड करण्यापूर्वी तंदुरुस्तीही जाणून घेतली आहे.”
या मालिकेसाठी निवडण्यात आलेले दोन्ही संघ कसे आहेत, जाणून घ्या…
पहिल्या दोन वन-डेंसाठी ः लोकेश राहुल (कर्णधार – यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (यष्टीरक्षक), शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, महंमद सिराज, महंमद शमी, तिलक वर्मा, प्रसिध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.
तिसऱ्या वन-डेसाठी ः रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, महंमद सिराज, महंमद शमी, कुलदीप यादव, अक्षर पटेल (तंदुरुस्त असल्यास), रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.
अश्विनची कामगिरी
११३ वन-डे
१५१ विकेट
शेवटची वन-डे
२१ जानेवारी २०२२