[ad_1]

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आता ३० वर्षांची झाली आहे. पण कमी वयातही तिने अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. आता लवकरच ती हॉलिवूडमध्येही पदार्पण करणार आहे. तिच्याबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घर आणि काम कसे हाताळायचे हे तिला चांगलेच माहित आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने मुलगी राहाला जन्म दिली. लेकीच्या जन्मानंतर काही महिन्यातच ती आपल्या कामावर परतली. पण तुम्हाला तिच्या पहिल्या बॉयफ्रेंडबद्दल माहिती आहे का?

आलिया भट्टचा नवरा आणि मुलगी

आलिया भट्टच्या लग्नाला दीड वर्ष झाले आहे. रणबीर कपूरला ६ वर्षे डेट केल्यानंतर दोघांनीही साधेपणाने लग्न केले. आता दोघांना राहा कपूर नावाची गोड बाहुली आहे. पण लग्नाआधी आलिया भट्टचे नाव सिद्धार्थ मल्होत्रा ते केविन मित्तल यांच्याशी जोडले गेले.

आलियाच्या खांद्यावर हात टाकून रणबीरनं फोटोसाठी दिली पोज


आलिया भट्ट पहिल्या प्रियकराचे नाव

आलिया भट्टच्या पहिल्या बॉयफ्रेंडचे नाव अली दादरकर आहे. त्यावेळी त्यांच्या नात्याच्या बातम्या खूप चर्चेत असायच्या. आलिया भट्टने २०१२ मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. करिअरची सुरूवात करण्यापूर्वी ती अली दादरकरला डेट करत होती.

आलियाचे अली दादरकरसोबत ब्रेकअप झाले

असे म्हटले जाते की, जेव्हा आलिया भट्टने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले त्यानंतर अली दादरकर आणि तिच्यामध्ये अंतर निर्माण होऊ लागले. हेच अंतर नंतर ब्रेकअपचे कारण बनले.
त्रास होत असतानाही काठी टेकत सुनील दत्त यांनी घेतलेली दिलीप कुमार यांची भेट, वाचा किस्सा
कोण आहे अली दादरकर

आलियाचा एक्स बॉयफ्रेंड अली दादरकरचा जन्म मुंबईत झाला. त्यांनी जमनाबाई नरसी शाळेत शिक्षण घेतले आणि त्यानंतर तो यूकेला शिक्षणासाठी गेला. अली आता मेकॅनिकल इंजिनीअर आहे. तो एकेकाळी दुबईत राहत होता. त्याला आना दादरकर नावाची बहीणही आहे.
सिद्धार्थ मल्होत्रामुळे झाले ब्रेकअप?

मीडिया गॉसिप्सनुसार, आलिया भट्ट आणि अली दादरकरचे ब्रेकअप सिद्धार्थ मल्होत्रामुळे झाले. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटानंतर आलियाची सिद्धार्थसोबतची जवळीक वाढली होती.

लोकप्रिय मॉडेलचे गंभीर आजारामुळे निधन; कुटुंबीयांनी केली मागणी-फुलं नका पाठवू त्यापेक्षा…
आलिया भट्ट १२वी पासही नाही…

आलिया भट्ट आणि अली दादरकर हे एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. आलिया १२ वीत असताना करणने तिला स्टुडंट ऑफ द इयरमध्ये कास्ट केले. त्यामुळे तिला पुढील शिक्षण पूर्ण करता आले नाही.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *