[ad_1]

मुंबई- चित्रपट निर्माता फरहान अख्तरने अखेर मंगळवारी ‘डॉन ३’ची घोषणा केली. त्याने एक छोटा व्हिडिओही शेअर केला. यासोबतच सनी देओलच्या ‘गदर २’ सोबत ‘डॉन ३’ चा टीझरही रिलीज होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. जेव्हा प्रेक्षक ११ ऑगस्ट २०२३ रोजी थिएटरमध्ये ‘गदर २’ पाहण्यासाठी जातील तेव्हा त्यांना ‘डॉन ३’ च्या टीझर व्हिडिओची खास भेट देखील मिळू शकेल. त्याचबरोबर ‘डॉन ३’मध्ये शाहरुख खानची जागा खरोखरच रणवीर सिंहने घेतली आहे का, हेही स्पष्ट होईल.

फरहान अख्तरने ‘डॉन ३’ चा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करून चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. या व्हिडिओमध्ये फक्त चित्रपटाचा लोगो दिसत आहे. सोबत ‘नव्या युगाची सुरुवात’ असे लिहिले आहे. याशिवाय फारशी माहिती देण्यात आलेली नाही. ११ ऑगस्ट २०२३ रोजी या चित्रपटाचा टीझर रिलीज होऊ शकतो असेही बोलले जात आहे.

देवदत्त नागेने कार पुसण्यासाठी सेटिंग बॉयलाच घेतलं उचलून, पाहा हा मजेशीर व्हिडिओ


गदर २ सह डॉन ३ चा टीझर

शाहरुख खान ‘डॉन ३’ मध्ये दिसणार नसल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. यावेळी प्रेक्षक रणवीर सिंहला ‘डॉन’च्या भूमिकेत पाहणार आहे. सध्या फक्त टीझरची वाट पाहत आहेत. निर्माते चित्रपटाबबात आणखी काही मोठी बातमी देतात का याकडेही प्रेक्षकांची नजर आहे. सध्या फरहान अख्तरने याबाबत कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही.
भामट्यांनी रचलेला प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अपहरणाचा डाव, पण दादांनी वेळीच दाखवले प्रसंगावधान
रणवीर सिंहने डॉन ३ साठी तयारी केली

‘पिंकविला’च्या रिपोर्टनुसार, रणवीर सिंहने ‘डॉन ३’साठी घोषणा व्हिडिओही शूट केला आहे. आता या आठवड्यात त्याचा टीझरही निर्मात्यांनी रिलीज केला आहे. गदर २, OMG २ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सोबतच चाहत्यांना ‘डॉन ३’ चा तडका देखील पाहायला मिळेल.

या कारणामुळे समीर वानखेडेंनी क्रांती रेडकरला घातली नव्हती मागणी, पण अशी जुळली रेशीमगाठ
जाणून घ्या डॉन सीरिजबद्दल

१९७८ मध्ये अमिताभ बच्चन ‘डॉन’मध्ये दिसले होते. जो सुपरहिट चित्रपट ठरला होता. त्यानंतर २००६ मध्ये फरहान अख्तरच्या दिग्दर्शनाखाली डॉन: द चेस बिगिन्स अगेन रिलीज झाला, ज्यामध्ये शाहरुख खानचा धमाकेदार अवतार दिसला. त्यानंतर पुन्हा २०११ मध्ये फरहान अख्तरने शाहरुख खानसोबत ‘डॉन २’ आणला. आता ‘डॉन ३’ येत आहे, तो २०२५ पर्यंत रिलीज होण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *