[ad_1]

मुंबई: दिग्दर्शक करण जोहर याचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. असं असलं तरी सिनेमा वेगळ्याच कारणामुळं वादात अडकला आहे. करण जोहरनं एका कार्यक्रमात आलिया भट्टच्या मेंदीबद्दल असं काही सांगितलं की, आता वाद निर्माण झालाय.
बर्थ डे आहे प्राजूचा! सई ताम्हणकरची खास पोस्ट,म्हणाली, आज बिल्डिंगमध्ये तुझ्या वतीने…
काय आहे नेमका हा मेंदीचा वाद?
तर झालं असं आहे की, करण जोहरच्या या सिनेमात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचा एक सीन आहे. आलिया आणि रणबीर कपूर यांचं लग्न आणि सिनेमातलं लग्न याच्यात काही दिवसांचं अंतर होतं. करण जोहरनं असं म्हटलं आहे की, सिनेमात लग्नाच्या सीनमध्ये आलियाच्या हातावर जी मेंदी आहे , ती तिच्या खऱ्या लग्नातलीच आहे. पण आता लोकप्रिय मेंदी आर्टिस्ट वीना नागदा हिच्या पोस्टनं नवा वाद निर्माण झालाय.

आलिया आणि रणवीर यांच्यावर एक गाणं चित्रित करण्यात आलं आहे. यात दोघांच्या लग्नाचे काही क्षण आहेत. याबद्दल बोलताना करण जोहर म्हणला होता की, आलिया आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या चार दिवसांनंतरच हे गाणं शूट करण्यात आलं होतं. आलियानं एका आठवड्यात दोन वेळा लग्न केलं. गाण्यात आलियाच्या हातावर जी मेंदी दिसतेय, ती तिच्या खऱ्या लग्नातलीच आहे. आम्ही तिच डिझाइन डार्क केली होती. या गाण्याचं शूटिंग जैसलमेर इथं झालं होतं.

सिनेमांत येण्यापूर्वी आलिया करत होती इंजिनियर मुलाला डेट, प्रसिद्धी मिळाली अन् आला दुरावा

आर्टिस्ट वीना नागदा यांची पोस्ट

वीना नागदा यांनी आलियाचे काही फोटो शेअर करत एक मोठी पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी करण जोहरचं नाव लिहिलं नसलं तर, अप्रत्यक्षपणे त्याच्या निशाणा साधलाय. त्यांनी आलियाच्या हातावरच्या मेंदीबद्दल लिहिलं आहे. सिनेता आलियाच्या हातावर जी मेंदी दिसतेय ती, लग्नाच्या मेंदीपेक्षा वेगळी होती. आम्ही सेटवरच तिच्या हातावर काढली होती. तसंच आधीच्या मेंदी आर्टिस्टचं श्रेय कोणी नाकारू शकत नाही. पण आम्ही सिनेमाच्या सेटवर आलियाच्या हातावर मेंदी काढली होती, हे देखील तितकंच खरंच. लोकांनी कमेंट करण्यापूर्वी विचार करायला हवा होता. याबद्दल अधिक काबी माहिती हवी असल्यास, मला मेसेज करा…असंही यात म्हटलं आहे.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *