[ad_1]

गुवाहाटी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरमधून १४ जानेवारीपासून सुरु केली आहे. मणिपूर, नागालँड या राज्यांमधील प्रवास पूर्ण केल्यानंतर भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये पोहोचल्यापासून चर्चेत आहे. भारत जोडो न्याय यात्रेचे पोस्टर्स आसाममध्ये फाडण्यात आले. काही गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. आज काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा दावा देखील केला. राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये दाखल होताच भाजप नेते आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर भ्रष्ट मुख्यमंत्री अशी टीका केली होती. आज राहुल गांधी यांची यात्रा सोनितपूर जिल्ह्यातून जात होती. यावेळी राहुल गांधी यांच्या गाडीजवळ भाजपचे झेंडे घेतलेला जमाव दाखला झाला. त्यातील काही जणांनी मोदी मोदीच्या घोषणा दिल्या, यावेळी राहुल गांधी यांनी त्यांना फ्लाइंग किस देत मोहब्बत की दुकान सर्वांसाठी खुलं असल्याचं म्हटलं.

राहुल गांधी यांनी घटनेचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन शेअर केला आहे. राहुल गांधी या प्रसंगी बसमूधन खाली उतरले होते. मात्र, सुरक्षारक्षकांनी त्यांना पुन्हा बसमध्ये बसण्यास सांगितलं.

काँग्रेसनं ट्वीट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. आसाम काँग्रेस अध्यक्ष भूपेनकुमार बोराह यांनी भाजपच्या गुंडांना समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मारहाण करण्यात आली. हा भाजपच्या द्वेषाच्या मानसिकतेचा पुरावा असल्याचं काँग्रेसनं म्हटलं.

काँग्रेसनं दावा केला की सोनितपूरमध्ये जयराम रमेश आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या कॅमेरा क्रूवर हल्ला करण्यात आला आहे. जयराम रमेश म्हणाले की सोनितपूरच्या जुमुगुरीघाट येथे भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि गाडीवर लावण्यात आलेले भारत जोडो न्याय यात्रेचे स्टीकर देखील फाडून टाकले. गाडीवर पाणी फेकण्यात आलं, भारत जोडो न्याय यात्रेविरोधात घोषणा देण्यात आल्या पण आम्ही संयम ठेवला, असं जयराम रमेश म्हणाले.
बारामतीला चार वेळा मुख्यमंत्रिपद पण दुर्दैवाने मोठे काम नाही, अजित पवार यांचा शरद पवार यांच्यावर हल्ला
जयराम रमेश यांनी या प्रकरणी आसामच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप केले. हिमंता बिस्वा सरमा हे सर्व करत आहेत, असा दावा रमेश यांनी केला. आम्ही घाबरणार नाही, संघर्ष करत राहू, असं जयराम रमेश म्हणाले.
धक्कादायक,उमरेड मार्गावर कमी भावात शेती मिळतेय म्हणून बोलवलं, प्रॉपर्टी डिलरला धावत्या कारमध्ये संपवलं,कारण…
दरम्यान, राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा २० मार्च रोजी मुंबईत पोहोचणार आहे.
वेध लोकसभा निवडणुकीचा : मविआचं ठरलं, महायुतीत कन्फ्यूजन, ‘यशवंत’ विचारांचा सातारा लोकसभेला काय करणार?Read Latest Maharashtra News And Marathi News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *