[ad_1]

मुंबई- प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्दीकी इस्माइल यांचे मंगळवारी, ८ ऑगस्ट रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. यकृताच्या आजारामुळे त्यांना गेल्या महिन्यात कोची येथील अमृता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवार, ७ ऑगस्ट रोजी दुपारी, सिद्दीकी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना एक्स्ट्राकॉर्पोरल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन (ECMO) सपोर्टवर ठेवण्यात आले. मात्र खूप प्रयत्न करूनही त्यांचा मृत्यू झाला.

एकामागोमाग एक जीवे मारण्याची धमकी, सलमान खानच्या सुरक्षेत वाढ; दिमतीला बुलेट प्रूफ कार


सिद्दीकी इस्माइल यांचे पार्थिव कडवंथरा येथील राजीव गांधी इनडोअर स्टेडियममध्ये ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते ११.३० या वेळेत ठेवण्यात येणार आहे. नंतर ते त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येईल, जेणेकरून लोकांना त्यांना श्रद्धांजली वाहता येईल. त्यानंतर बुधवारी सायंकाळी ६ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सिद्दीकी यांच्या पश्चात पत्नी सजिता आणि त्यांच्या तीन मुली- सुमाया, सारा आणि सुकून असा परिवार आहे.

जुळ्या मुलींची नावं झिया आणि जायदा का ठेवली? समीर वानखेडेंनी सांगितली नावांमागची गोष्ट
फाजिलच्या मदतीने इंडस्ट्रीत प्रवेश केला

सिद्दीक इस्माइल हे लोकप्रिय मल्याळम चित्रपट दिग्दर्शक होते. फिल्ममेकर फाजीलच्या मदतीने त्यांनी इंडस्ट्रीत प्रवेश केला. ते आणि त्यांचा मित्र लाल यांना कोचीन कलाभवनच्या मिमिक्री ट्रूपसोबत एका परफॉर्मन्सदरम्यान फाझिलने पाहिले होते. मल्याळम व्यतिरिक्त, सिद्दिकी तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांचे देखील दिग्दर्शक आहेत. त्यांनी सलमान खानच्या बॉडीगार्डचे दिग्दर्शन केले होते, ज्यात करीना कपूर देखील होती. २०२० मध्ये प्रदर्शित झालेला ‘बिग ब्रदर’ हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. यात अरबाज खान, अनूप मेनन, विष्णू उन्नीकृष्णन, सर्जनो खालिद, हनी रोज, मिर्ना मेनन, चेतन हंसराज, गाधा, सिद्दीक आणि टिनी टॉम यांच्यासोबत मोहनलाल मुख्य भूमिकेत होते.

त्रास होत असतानाही काठी टेकत सुनील दत्त यांनी घेतलेली दिलीप कुमार यांची भेट, वाचा किस्सा
सिद्दीकी इस्माईल चित्रपट

सिद्दीकी-लाल या जोडीने दिग्दर्शनात आपली कारकीर्द सुरू केली आणि रामजी राव स्पीकिंग (१९८९) या कॉमेडी चित्रपटाद्वारे पदार्पण केले. यामध्ये स्वतः फाजील यांनी पैसे गुंतवले होते. यानंतर त्यांनी मल्याळम चित्रपटाच्या इतिहासातील मालिका सुरू केली. ‘हरिहर नगर’ (१९९०), ‘गॉडफादर’ (१९९१), ‘व्हिएतनाम कॉलनी’ (१९९२), ‘काबुलीवाला’ (१९९३), ‘हिटलर’ (१९९६) सारखे हिट चित्रपट केले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *