[ad_1]

मुंबई- नीना गुप्ता मोठ्या पडद्यावर तिच्या नॉन-ग्लॅमरस भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत, पण खऱ्या आयुष्यात त्या खूपच ग्लॅमरस दिसतात. नीना सध्या चित्रपटांपासून ते वेब सीरिजच्या दुनियेत खूप सक्रिय आहेत. ‘ट्रायल पीरियड’च्या सक्सेस पार्टीमध्ये नीना गुप्ता यांनी आपल्या अतिशय ग्लॅमरस स्टाईलने सर्वांची मने जिंकली आहेत.

नीना गुप्ता या आता ६४ वर्षांच्या आहेत पण काल झालेल्या पार्टीतील त्यांचा लूक हा त्यांच्या वयाचा थांगपत्ता लागू देत नव्हता. या पोशाखात नीना यांनी स्वत:ला खूप छान सांभाळले आणि पापाराझींसाठी पोजही दिल्या. या व्हिडिओमध्ये नीना कारमधून उतरल्यानंतर आधी पोझ देताना आणि नंतर लिफ्टच्या इथे जाऊन वाट पाहताना दिसल्या.

सलमानच्या बॉडीगार्ड चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे निधन, ६३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
‘आयुष्यात आत्मविश्वासाने जगले पाहिजे, जे आवडते ते करा’

व्हिडिओमध्ये नीना हसतमुख आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण दिसत आहे. अनेक युजर्सनी नीनाचे जोरदार कौतुक केले आहे. मात्र, त्यांच्यामध्ये असे काही युजर्सदेखील आहेत ज्यांना यावेळी त्यांची स्टाइल आवडली नाही. एका युजरने म्हटले आहे – आयुष्य आत्मविश्वासाने जगले पाहिजे, तुम्हाला जे आवडते ते करा, लोकांची पर्वा न करता, आयुष्य एक ना एक दिवस पूर्ण होईल. एक म्हणाला- जेव्हा आपण ५० पेक्षा जास्त वय असलेल्या परदेशी स्त्रीला अशाच पोशाखात पाहतो तेव्हा आपण कधीही जज करत नाही किंवा टिप्पणी करत नाही. दुसरा म्हणाला- माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही, त्या खूप सुंदर दिसत आहे. दुसर्‍याने लिहिले- चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी वयाला आत्मसमर्पण केले नाही, बहुतेक लोक पन्नाशीनंतर जगणे सोडून देतात.

शाहरुख की रणवीर ? डॉन ३ मध्ये कोण? उत्तरासाठी पाहावा लागणार गदर २
एकाने सांगितले – वय लक्षात घेऊन कपडे घालावेत

त्याच वेळी, दुसर्‍या युजरने म्हटले आहे – ठराविक वयानंतर, आपण शोभतील असेच कपडे घालावेत, असे विचित्र कपडे घालणे आणि आनंदाने जीवन जगणे यात काही संबंध नाही. एकजण म्हणाला – काकी जी, तुम्ही तुमचे वय लक्षात घेऊन कपडे घाला, ते तुम्हाला शोभत नाहीत. एकजण म्हणाला – मला वाटलं ती पूजा भट्ट आहे.

‘पंगा’ चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला? पाहा प्रतिक्रिया

अनेक वेब सिरीज आणि चित्रपटांमध्ये दिसल्या आहेत नीना गुप्ता

नीना गुप्ता अलीकडच्या काळात ‘पंचायत’, ‘लस्ट स्टोरीज २’, ‘मसाबा मसाबा’ यांसारख्या सीरिजव्यतिरिक्त ‘उंचाई’, ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’, ‘बधाई हो’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसल्या आहेत.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *